Leading International Marathi News Daily
रविवार, २९ मार्च २००९

लोकसत्ता कॅम्पेन
‘ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारीही हवी’

‘लोक’ प्रगल्भ झाले, तरच ‘लोकप्रतिनिधी’ प्रगल्भ होतील. त्यासाठी सर्वसामान्यांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे आणि ते म्हणजे मतदान. योग्य व्यक्तीला मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडावा. उदासीनतेपोटी ‘वरीलपैकी कुणीही नाही’ हा पर्याय निवडणे म्हणजे अनाहुतपणे नको त्या व्यक्तीला निवडून येण्यासाठी मदत करण्यासारखेच आहे. त्यामुळे हा पर्याय निवडणुकीसाठी योग्य ठरणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीने आपला मतदानाचा हक्क बजावायलाच हवा, असा मंत्र प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी मागील आठवडय़ात ‘रविवार वृत्तान्त’च्या माध्यमातून दिला.

एक.. दोन.. कितीही!
या चित्रपटाचे ‘एक’ हे नाव सार्थ करणारे चित्रपटात काहीतरी नक्कीच असले पाहिजे! चित्रपट सुरू होतो तेव्हापासूनच आपण हे ‘एक’ म्हणजे नेमके काय आहे याचा शोध घेऊ लागतो. या चित्रपटातले सर्वात मोठे रहस्य म्हणजे, त्याचे नाव ‘एक’ का ठेवले गेले याचा पत्ता प्रेक्षकांना, चित्रपट संपल्यावरही लागत नाही! ‘एक’ मात्र खरे की या कथानकाला काय शीर्षक द्यावे असा ‘एक’ मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल आणि त्यातून सुटण्यासाठी बहुधा ‘एक’ हेच नाव ठोकून दिले गेले असावे. चित्रपटाचे कथानक पाहून आपल्या लक्षात येईल की त्याचे नाव ‘एक’- ‘दोन’- ‘तीन’- ‘चार’ काहीही ठेवले असते तरी चालून गेले असते! आता मुख्य प्रश्न राहिला तो ‘चित्रपट कसा आहे?’ त्याचे उत्तर असे की, ‘तुम्ही तुमच्या आयुष्यात एक पिक्चर नाही पाहिला तर काही बिघडणार नाही!’

सूनबाईची सत्त्वपरीक्षा
आपण आपले मराठी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना उगाचच झोडतो आणि त्यांच्या ‘सौभाग्य वस्तू भांडारां’वर टीका करतो. दीपा मेहतासारख्या जगप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शिकेने ‘विदेश-हेवन ऑन अर्थ’ नामक चित्रपटात ‘मराठी छाप’ कथानक घेऊन मराठीचे महत्त्वच अधोरेखित केले आहे.

डोंगरकुशीतलं उत्कट प्रेमकाव्य
रानावनातलं धुंद संगीत ध्यानीमनी साठवीत, त्याच्याशी अलवार हितगुज करीत आणि त्यातली लयबद्धता अन् नाद आपल्या अवघ्या देहात सामावून घेत त्यास आपल्या रोमॅंटिक लेखणीतून शब्दरूप देणारं कवी ना. धों. महानोर नावाचं जितंजागतं काव्य पळसखेडच्या निसर्गरम्य परिसरात आजही वस्तीला आहे. त्यांच्या सौंदर्यासक्त लेखणीतून उतरलेलं निसर्ग व स्त्रीच्या सृजनशील नवनवोन्मेषांचं गारूड गेली ४० वर्षे रसिकमनांवर मोहिनी टाकून आहे. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी रसिकांना केवळ निसर्गच आकळला नाही, तर त्यांतून जीवनाबद्दलची असोशी अन् एक अनावर ओढही त्यांच्यात पेरली.

सुजाण पालकत्वासाठी
अंजली लिमये यांनी पालक-बालक सुसंवाद या विषयाचा अभ्यास करून, चर्चा-सभांद्वारे पालकांशी चर्चा करून प्रकल्प अहवाल तयार केला. त्या अहवालावरील हा लेख. एल.आय. सी.तील नोकरी व गृहिणीपद सांभाळताना स्वत:चे व्यक्तिमत्त्व विकसित करणाऱ्या व तसेच नेतृत्वगुण विकसित करणाऱ्या एका कोर्स LANDMARK EDUCATION बद्दल माहिती मिळाली. नुसती माहितीच नाही तर जवळच्या नातलगाकडून चांगला अनुभवही मिळाला. म्हणून मुळातच अतिउत्साही (मी) त्यासाठी प्रवेश घेतला.

आर्ट फ्रॉम बिहाईंड बार
कला मग ती कोणतीही असो तिला अभिव्यक्त होण्यासाठी वयाची अथवा शब्दांची मर्यादा नसते. किंबहुना समाजाने परंपरेच्या नावाखाली तयार केलेल्या शब्दांना कलेच्या ‘डिक्शनरीत’ थाराच नसतो. मग समाजाच्या नजरेत वाईट, खलनायक, समाजकंटक ठरलेल्यांच्या कलेला तरी ‘गजां’चा अडसर कसा असू शकेल. खून, चोऱ्या, दरोडे असे गुन्ह्ये करणाऱ्या हातांमध्ये कॅनव्हावर रंग भरण्याची कला दडली आहे हे ‘नो युवर एन्व्हायर्न्मेंट’ या संस्थेने जगापुढे आणले आहे. ‘नो युवर एन्व्हायर्न्मेंट’ने महाराष्ट्रातील विविध तुरूंगात बंदिस्त असलेल्या कैद्यांमधील कला चित्रांच्या माध्यमांतून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘दो आँखे बारह हात’ या चित्रपटातील नायक ज्या प्रकारे कैद्यांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करून त्यांना नव्याने आयुष्य जगायला शिकवतो. काहीसे त्याचप्रकारे ‘नो युवर एन्व्हायर्न्मेंट’ने कमलानयन बजाज कला दालनात या कैद्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवून त्यांच्याबद्दलचा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

तर कळवा आम्हाला..
यू गेट द किंग यू डिझव्‍‌र्ह.. या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. राजकारणापासून सामान्य समाज अलिप्त राहायला लागल्यापासून आपला प्रवास त्या क्षेत्रात अधोगतीच्याच दिशेने सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.. निवडून कुणीही आले तरी आपल्याला काय फरक पडतो, ही मानसिकताच त्याच्या मुळाशी आहे. आता या मानसिकतेला छेद द्यायला हवा. नेमकी तीच भूमिका प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मांडली आहे. केवळ राजकारणसाक्षर नव्हे तरी राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ व्हायला हवे, असे सांगताना त्यांनी ‘मतदानामध्ये ‘वरीलपैकी कुणीही नाही’ हा पर्याय तर राजकीयदृष्टय़ा आत्महत्याच असेही म्हटले आहे. अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला २२८४६२७७/ २२८२२१८७ वर फॅक्सने पाठवू शकता किंवा vruttant@gmail.com या ई मेलवर नोंदवू शकता.

लोकप्रतिनिधीला परत बोलविण्याचा अधिकार हवा!
एप्रिलमध्ये होणाऱ्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्याचे व देशाचे वातावरण तापू लागले आहे. राजकीय नेत्यांचे या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारण्याचे काम जोरात सुरू आहे. राजकीय पक्षांचे एकमेकांशी युती करणे, एकमेकांवर कुरघोडी करणे असे बहुविध कार्यक्रम चालू आहेत.

अंतिम जबाबदारी मतदारांचीच!
समाज, जनता आणि मतदान या विषयांवर आत्मपरीक्षण केल्यावर पुढील विचार सुचले. ६० वर्षांपूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर शिक्षित (सर्वच साक्षरांना सुशिक्षित म्हणणे अतिशयोक्ती वाटते) व्यक्ती जास्तीत जास्त आत्मकेंद्रित झालेल्या दिसतात. विचार आणि कृती स्वत:साठी, शक्य असल्यास कुटुंबासाठी (फार तर नातेवाईकांसाठी) करण्यावर भर दिसतो. समाज- राज्य- देश यासाठी काही विचार आणि कृती करण्याची वेळ आली तर त्यात माझा, कुटुंबाचा त्वरित काय फायदा होणार, असा स्पष्ट प्रश्न विचारला जातो, अशा विचारामध्ये मतदान करणे अजिबातच येत नाही मग कृती कशी असणार? जितके शिक्षण जास्त, आर्थिक स्तर जास्त तितकी संवेदनशीलता कमी असते का, अशी शंका येते.

ठाण्यात एप्रिलमध्ये भव्य व हायटेक वधू-वर मेळावा
प्रतिनिधी

ठाण्यामध्ये ५ ते ८ एप्रिलदरम्यान एक आगळा व भव्य वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ठाणे पूर्वेकडील युनायटेड स्पोर्टस् क्लबच्या पटांगणामध्ये हा मेळावा होत आहे. ‘शुभमंगल वधू- वर मेळावा’ असे याचे नाव असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून याचे आयोजन करण्यात आले आहे. सी. सी. टीव्हीचा वापर, व्हिडियो रेकॉर्डिग अशा हायटेक तंत्रांचा वापर मेळाव्यात केला जाणार असून ‘लोकसत्ता’ या मेळाव्याचा सहप्रायोजक आहे.

कासा-बेलाच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवात
प्रतिनिधी

रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचा समूह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोढा ग्रुपच्या डोिबवली येथील महत्त्वाकांक्षी ‘शहर निर्माण प्रकल्पा’च्या पहिल्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन झाले. या प्रकल्पाद्वारे डोंबिवलीमध्ये एक ‘मिनी शहर’ उभारण्याचा लोढा ग्रुपचा मानस आहे.