Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९

अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार रांगेत !
नागपूर, ३० मार्च/ प्रतिनिधी

पंधराव्या लोकसभेसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी, सोमवारी विदर्भात विविध राजकीय पक्षांच्या आणि अपक्ष उमेदवारांनी मोठय़ा संख्येत उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपुरात तर प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरताना गर्दी केल्यामुळे त्यांना रांगेत उभे राहावे लागले. प्रफुल्ल पटेल, नरेश पुगलिया, आनंदराव अडसूळ, हरिभाऊ राठोड, नाना पटोले, अशोक नेते, मारोतराव कोवासे, डॉ. राजेंद्र शिंगणे या प्रमुख उमेदवारांचा आज अर्ज भरणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

राष्ट्रवादीची आझमभाई पानसरे व रवींद्र पाटील यांना उमेदवारी
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसने आज मावळ लोकसभा मतदारसंघातून आझमभाई पानसरे व रावेरमधून रवींद्र पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट दिले नव्हते. त्या पाश्र्वभूमीवर मावळसारख्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असलेल्या मावळ मतदारसंघातून पानसरे यांना उमेदवारी देणे हे महत्त्वाचे समजले जात आहे.

वाघ, कोल्हा आणि ससा
वाघ- तर मग ठरलं! आजपासून आपण सगळे समान!
कोल्हा- म्हणजे तुम्ही स्वत:ला आता जंगलचे राजे म्हणून घेणार नाही?
वाघ- अजिबात नाही. मी या जंगलचा एक सामान्य रहिवासी आहे आजपासून.
ससा- अरे बापरे! ते कसं काय शक्य आहे?
वाघ- का शक्य नाही? अरे सगळ्या जगात लोकशाही आहे आता. लोक मतदान करतात आणि नेत्यांना निवडून देतात.
ससा- म्हणजे एकूण तेच. आम्ही तुम्हालाच निवडून द्यायचं असंच ना?
वाघ- (रागाने) ए ससुटल्या, उगाच लोकशाही प्रक्रियेत खोडा घालू नकोस.

मराठीच्या मुद्दय़ावर राष्ट्रवादी काँग्रेसही झाली अचानक आक्रमक
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

मराठी विरुद्ध उत्तर भारतीय या मुद्दय़ाचे अघोषित पेटंट राज ठाकरे यांच्याकडे असले तरी ईशान्य मुंबईमधून आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही अप्रत्यक्षरित्या मराठी विरुद्ध गुजराती अशी प्रचारमोहीम सुरू केली आहे. किरीट सोमय्या यांच्यामुळे भाजपमधील मराठी उमेदवारांवर कायमच अन्याय झाल्याचा प्रचार आता भाजपमधील सोमय्याविरोधी गटापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच जोरदारपणे करीत आहेत.

कसाबला पवारांनी संघ स्वयंसेवक म्हटले नाही हे नशीब - गडकरी
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील एक आरोपी कसाब हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले नाही हे नशिब, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी लगावला आहे. शरद पवार यांनी काल केलेल्या वक्तव्याबाबत भाजपने मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे.

विश्वनाथ पाटील यांना शिवसेनाच अपक्ष लढवत असल्याची भाजपची तक्रार
मुंबई, ३० मार्च/प्रतिनिधी

भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विश्वनाथ पाटील यांना अपक्ष निवडणूक लढविण्याकरिता शिवसेनेकडून फूस लावली जात असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला. पाटील यांना अपक्ष उमेदवारीपासून परावृत्त केले तरच भाजप आपला उमेदवार जाहीर करील, असेही या नेत्याने सांगितले. भिवंडी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या कोटय़ात जाईल या शक्यतेमुळे कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील यांनी शिवसेनेशी सलगी केली.

काँग्रेसच्या प्रचाराची भिस्त बॉलिवूड स्टारवर!
मुंबई, ३० मार्च / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरु होते ती प्रचारसभांचा धुमधडाका सुरु झाल्यानंतर. आपल्या विरोधकांवर तुटून पडणारे आणि हमखास टाळ्या घेणारे असे आक्रमक वक्ते, प्रसिद्ध सिनेअभिनेते, अभिनेत्री, नामवंत व्यक्ती यांना जनतेची विशेष पसंती असते. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षाच्या उमेदवारांना अवघे काही दिवसच मिळणार असल्याने अधिकाधिक मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचारासाठी पद्धतशीर आखणी केली आहे.

पूना मसाला
पॉवरफुल्ल!

बहुतेक वेळा पुरस्कारामुळे एखादा कार्यकर्ता, खेळाडू प्रसिद्धीला येतो. परंतु, काही सन्मान्य अपवादांमुळे मात्र संबंधित पुरस्कारविजेत्या व्यक्तीमुळेच तो पुरस्कार प्रकाशात येतो! तसंच काहीसं मंत्रिमंडळातील खात्यांबाबतही आहे. मोठय़ा खात्यासाठी बडय़ा नेत्यांचीही रस्सीखेच सुरू असते. मंत्री कार्यक्षम नसला, तरी त्या खात्यामुळे त्याचा रुबाब राज्यभर होतो. परंतु, काही वेळा मंत्र्यांमुळे खाती कार्यक्षम ठरतात.