Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

वीजनिर्मिती प्रकल्पाची दोन वर्षे, पूर्ती साखर कारखान्यात ऊर्जा दिन
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

पूर्ती साखर कारखाना लिमिटेडतर्फे बेला येथील वीजनिर्मिती प्रकल्पाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 

यंदा पूर्ती साखर कारखान्याने १०५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कारखान्याने २४ मेगाव्ॉट वीज निर्मिती केली आहे. यात ५० हजार लिटरची डिस्ट्रिलरी, सेंद्रीय जैविक खत इत्यादी सर्व प्रकल्प सुरू आहेत. यावर्षी उसाचे प्रमाण कमी असल्यामुळे साखर निर्मितीचे ध्येय पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, येत्या कालावधीत लक्ष केंद्रित करून ऊस लागवडीकडे लक्ष देण्यात येईल, असा संकल्प यावेळी करण्यात आला. पुढील काळात उसाची विक्रमी लागवड करून पूर्ती साखर कारखाना उद्दिष्ट साध्य करेल, असे प्रतिपादन पूर्तीचे व्यवस्थापक संचालक सुधीर दिवे यांनी सांगितले.
पूर्ती साखर कारखान्याची निर्मिती ही शेतक ऱ्यांच्या सर्वागीण विकासासाठी स्थापन झालेली असल्यामुळे पूर्ती पासून मिळणारा लाभ हा भागधारक, कर्मचारी व संचालक यांच्यात वाटण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विदर्भात सर्वाधिक पगार देणारी कंपनी राहील, असे सांगून यंदा कर्मचाऱ्यांना १० टक्के पगारवाढ देण्याची घोषणा अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केली. यावेळी कारखान्याचे तांत्रिक संचालक प्रभाकर कुकडे यांचा ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मोहम्मद हफीज गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.