Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्वामी समर्थ स्वरांजली सीडीचे प्रकाशन
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

संतकवी कमलासूत चंद्रशेखर वऱ्हाडपांडे रचित स्वामी समर्थ स्वरांजली या सीडीचे विमोचन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य राम शेवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. रेशिमबागेतील संत गजानन महाराज मंदिराच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समृद्धी सहकारी बँकेचे अध्यक्ष काकासाहेब लोखंडे, किशोर धाराशिवकर, विठ्ठलराव तेलंग, विजयराव कुऱ्हेकर, सुनंदा कुऱ्हेकर

 

उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य शेवाळकर म्हणाले, संतकवी कमलासूत यांनी रचलेल्या गीतांच्या सीडी केवळ नागपुरात नाही संबंध महाराष्ट्रात पोहोचल्या आहेत. कमलासुतांना संताची प्रेरणाशक्ती असल्यामुळे त्यांच्या सगळ्या रचना प्रासादिक असतात म्हणून भविकांना त्या आवडतात आणि भावतात. काकासाहेब लोखंडे यांनी संत दादाजी धुनिवाले महाराज यांच्यावरील कमलासुतांच्या गीतरचनेची सीडी संस्थेतर्फे प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले.
अक्कलकोट स्वामी समर्थांच्या अवतार कार्यावर आधारित या सीडीत एकूण १० गीते आणि शेजारती असून या गीतांना गिरीश वऱ्हाडपांडे यांनी स्वरबद्ध केले आहे. संगीत संयोजन नंदू होनप यांचे आहे.
या सीडीमधील गीते अजित कडकडे, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, नेहा राजपाल आणि निरंजन बोबडे यांनी सादर केली आहेत. निवेदन चंद्रशेखर वऱ्हाडपांडे यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीरंग संगीत विद्या मंदिरच्या विद्यार्थी प्रांजली वऱ्हाडपांडे, चारुलता कडू, शुभांगी देशपांडे यांनी शारदास्तवन सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रघुनाथ बोबडे, विठ्ठलराव जोशी, ममता मानकर, डॉ. सुनील पाकडे, परिक्षित उपाध्ये, मयुरा मानकर, प्रसाद जोशी, निखिल पिंपळगावकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश वऱ्हाडपांडे यांनी केले.