Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

जीवनधारा कर्मशाळेच्या मुलांचे स्नेहसंमेलन
नागपूर, ३० मार्च/प्रतिनिधी

‘दाटला काळोख तरी होऊ नका निराश, देवाने दिला प्रत्येकाला पावलापुरता प्रकाश’ या काव्य पंक्तींची आठवण देत जीवनधारा कर्मशाळेच्या मुलांनी एकापेक्षा एक सरस कार्यक्रम सादर केले.
गेल्या ७ वर्षांंपासून सरकारी अनुदानाविना चालणाऱ्या या शाळेतील मुलांच्या सुप्त गुणांना वाव

 

देण्यासाठी २५ मार्चला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन तरुण भारतचे प्रबंध संचालक अरुण पत्की यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी माधव झोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआयचे अध्यक्ष सतीश ईटकेलवार, नगरसेविका अरुणा ग्वालबंशी, पार्वती दुल्लरवार, मतिमंद मुलींच्या बालगृहाच्या स्थायी समितीच्या अध्यक्ष सुहासिनी क्षीरसागर, संस्थेचे संस्थापक सचिव गुलाब दुल्लरवार उपस्थित होते.
या मतिमंद मुलांनी, सामान्य बुद्धी असणाऱ्यांवर मात करत, एकापेक्षा एक सुंदर कला सादर केल्या. २६/११ ला शहीद झालेल्या वीर सुपूत्रांना समर्पित अरणारे एक नाटय़ रूपांतर सादर करून मुलांनी रसिक श्रोत्यांची मने जिंकले. कार्यक्रमाची सुरुवात भक्तीगीताने आणि शेवट चित्रपटातील नृत्याने करण्यात आला. यावेळी २००८-०९चे उत्कृष्ट निर्देशक म्हणून दीपिका शाहू, कनिष्ठ लिपीक म्हणून वीणा देवईकर व उत्कृष्ट काळजीवाहक म्हणून अश्विनी ढोबळे यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रमोद कुंभारे यांनी केले. कार्यक्रमाला जीवनधाराचे अधीक्षक अमित कल्लमवार, संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दुल्लरवार, सहसचिव प्रेरणा दुल्लरवार, कोषाध्यक्ष प्रमोद हलमडोहकर, नवजीवन शाळेचे अध्यक्ष जगदीश मदने, स्वावलंबी शाळेचे अध्यक्ष भास्कर मनवर, ताहेरा शेख, वंदना आगरकर, पुष्पा उप्पलवार, जितेंद्र पाटील, अनुप गौर, प्रवीण द्रविडकर आदी उपस्थित होते.