Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मानव जोडो साहित्य रत्न पुरस्काराची घोषणा
नागपूर, ३० मार्च / प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगे महाराज या दोन्ही महामानवांच्या साहित्यावर व जीवनावर नव्या जुन्या पिढीला लिहिते करून त्याचा भावी पिढीला अभ्यास व चिंतन करण्यासाठी उपयोग व्हावा यादृष्टीने राष्ट्रसंतांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त मानव जोडो साहित्य रत्न पुरस्कार सुरू

 

करण्यात आला आहे.
या पुरस्कारासाठी सर्व साहित्यिकांनी १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१० पर्यंत या महामानवांच्या साहित्यावर, जीवन कार्यावर मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा अन्य भाषेत जास्तीत जास्त लेखन करावे व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखांची कात्रणे तारीखवार संग्रह करून रमेशचंद्र सरोदे, सरचिटणीस, मानव जोडो साहित्य रत्न पुरस्कार कार्यालय, साहूर, ता. आष्टी, जिल्हा वर्धा या पत्त्यावर पाठवावे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चंद्रपूरच्या घनदाट जंगलातील वाघाच्या गुहेत, अखिल भारतीय साधुसमाजाच्या आखाडय़ात, शेतकऱ्यांच्या मेळाव्यात अत्यंत धकाधकीच्या आयुष्यात अहोरात्र जनसेवेतून अनुभवलेले असे प्रचंड गद्य-पद्य मराठी साहित्य लिहिले आहे. त्यांचा ग्रामगीता हा गं्रथ अनेक भाषांमधून प्रकाशित करण्यात आला आहे. कर्मयोगी गाडगेबाबा यांनी स्वत साहित्य लेखन केले नसले तरी त्यांचे जीवनच साहित्य आहे. त्यामुळे दोन्ही महामानवांवर नवोदित व प्रस्थापित साहित्यिकांनी लेखन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५२३३४१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.