Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

मराठा हायस्कूलच्या ३२ खेळाडूंना स्पोर्टस टॅलेंट सर्च शिष्यवृत्ती
भारत सरकारच्या स्पोर्टस अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियातर्फे नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ स्पोर्टस या शाखेच्या वतीने राज्यातील उगवत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या स्पोर्टस टॅलेंट सर्च शिष्यवृत्तीकरिता मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलच्या २५ हँडबॉल व सात

 

तलवारबाजीच्या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने आयोजित राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी खेळाडूची निवड करण्यात आली आहे. हँडबॉल खेळाडू प्रांजली मोरे, प्रिया शिंदे, प्रेरणा आथरे, निकीता तुंगार, शितल बरदाळे, दिपाली जगझाप, निशा सोनवणे, प्रतिक्षा जाधव, प्रांजल दरेकर, कोमल सोनार, सागर टर्ले, अक्षय तासकर, शेख जुनेद, विप्लव आहेर, शुभम गौरखेडे, विशाल आहेर, रोहन आहेर, विशाल मुर्तडक, शशिकांत थेटे, संकेत पाटील, सर्वेश आहेर, महेश चौधरी, आकाश कराड, कल्पेश येवला, शुभम काळे तलवारबाजीत सुशिल जाधव, सागर पाटील, युवराज सोनवणे, मधुरा पाटील, चैताली चिडे, दुर्गा बाऊस्कर, विशाल देवरे यांचा शिष्यवृत्ती प्राप्त खेळाडूंमध्ये सहभाग आहे. प्रत्येक खेळाडूला ६ हजार सहाशे रुपये शिष्यवृत्ती मिळालेली आहे. एकावेळी ३२ खेळाडूंना शिष्यवृत्ती मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या खेळाडूंना क्रिडाशिक्षक सुदाम आथरे, अरूण पवार, संजय होळकर, निर्मला चौधरी, उज्वला बागूल व प्रा. हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष अरविंदजी कारे, सभापती अ‍ॅड नितीन ठाकरे, मुख्याध्यापक डी. के. दरेकर, पर्यवेक्षक जी. डी. मोरे, एच. आर. वाघ यांच्या उपस्थित धनादेश वाटप करण्यात आले.-
प्रतिनिधी, नाशिक