Leading International Marathi News Daily
मंगळवार, ३१ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

चांदवड विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत 'आपलं पॅनल ' विजयी
चांदवड / वार्ताहर

येथील विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत वर्कर्स फेडरेशन पुरस्कृत आपलं पॅनलने सर्व जागाजिंकत विरोधी शक्ती पॅनलचा धुव्वा उडवला. २० संचालकांच्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आपलं पॅनलच्या दोन महिला उमेदवारांची याआधीच अविरोध निवड झाली

 

होती.
१८ जागांसाठी आपलं पॅनल व इतर संघटनांचे शक्ती पॅनल यांच्यात लढत झाली. सत्ताधारी आपलं पॅनलने आठ कोटी रूपयांचे भागभांडवल असलेल्या या संस्थेला एक कोटीपेक्षा अधिक रकमेचा नफा मिळवून दिला आहे. या पतसंस्थेची निवडणूक अविरोध व्हावी, अशी सभासदांची इच्छा होती. परंतु विरोधकांनी तडजोडीस नकार दिल्याने अखेर निवडणूक घ्यावी लागली. त्यामुळे संस्थेला लाखो रूपयांचा खर्च सहन करावा लागला. यामुळे सभासदांमध्ये निर्माण झालेला असंतोष मतपेटीतून बाहेर पडला.
वर्कर्स फेडरेशनच्या विजयी उमेदवारांची नावे व मते-चांदवड विभागात बाळासाहेब साळुंके (८४०), उपविभागात बळीराम शिंदे (८७६), मालेगाव विभागात श्रीकांत पाटील (८३९), उपविभागात गुरूदास वाघ (८३७), सटाणा विभागात देवमन पवार (९१६), नामपूर उपविभागात वामन तिसगे (९११), मनमाड उपविभागात रमेश राजवाडे, नांदगाव उपविभागात दशरथ जगधाने (८९०), लासलगाव उपविभागात भाऊसाहेब संधान (८७२), निफाड व सिन्नर उपविभागात माधव दाभाडे (८८२), पिंपळगाव व ओझर उपविभागात ज्ञानदेव घुले (८७३), नाशिक परिसर विभागात पंडितराव पगार (८९८), येवला उपविभागात संजय कदम (९००), पेठ उपविभागात हिरामण पवार (९०३), देवळा उपविभागात गोविंद आहेर (९०४), अनुसूचित जाती जमाती विभागात मदन पवार (९१५), इतर मागासवर्गीय विभागात प्रमोद कुलथे (८८०), विमुक्त जाती भटक्या जमाती विभागात सुदाम सानप (९१९) यांचा समावेश आहे. महिला राखीव गटातून कौशल्याबाई ढिकले व शोभा कुमावत यांची याआधीच अविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. दवते यांनी काम पाहिले.