Leading International Marathi News Daily
बुधवार, १ एप्रिल २००९
  वेळेच्या व्यवस्थापनातून यशप्राप्ती
  इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्ट
  इन्श्युरन्स क्षेत्रातील करिअर
  फ्लेमिश शिक्षणप्रणालीच्या अनुभूतीची संधी!
  विदेशातील प्रवेश प्रक्रिया : अर्जासोबतची कागदपत्रे
  वर्णनात्मक सर्वेक्षणपद्धती
  एलआयसी असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरपदाची तयारी
  शेअर बाजारातील करिअर
  आर्थिक मंदी स्त्रियांच्या करिअरचा अरुणोदय ठरावी!

 

यशाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी आहे. एखाद्या शिक्षकाला आपले विद्यार्थी चांगले गुण मिळवीत आहेत हे पाहण्यात; तर एखाद्या व्यावसायिकाला व्यवसायातील स्पर्धेत अग्रेसर राहण्यात यश दिसेल, तर एखाद्या कलाकारासाठी यशाची व्याख्या आणखी वेगळी असेल.
यश म्हणजे प्रवासातील अंतिम ठिकाण नसून यश म्हणजेच एक प्रवास आहे हे या मार्गावरून जाणाऱ्या बऱ्याच जणांना उमगलेले असते आणि हो शिक्षणाचा मूळ उद्देश हा लोकांना जीवनातील यशासाठी तयार करणे हा आहे तरीसुद्धा यशाच्या व्याख्या या व्यक्तीनुसार बदलतात. त्याचप्रमाणे यशाची रूपेही अनेक आहेत त्यामुळेच यशाच्या व्याख्याही अनेक आहेत.
यश मिळविण्यासाठी रोज जिंकण्याची फक्त स्वप्ने पाहावी लागणे आवश्यकच नाही तर दररोज एखाद्या विजेत्यासारखाच विचार आवश्यक आहे त्यामुळे यशाचा सतत विचार ही यशाची पहिली पायरी आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही म्हणूनच जी माणसे जीवनात यशस्वी झाली आहेत त्यांचा ‘अ‍ॅटिटय़ूड’ हा एखाद्या विजेत्याचा होता. म्हणूनच जी माणसे सतत
 

आपल्या ध्येयपूर्तीचा आणि यशाचा विचार करतात अशाच माणसांना यशस्वी असे म्हणतात आणि अशी यशस्वी माणसे प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता आव्हानाचा सामना समर्थपणे करतात व विजयी होतात आणि हा विजय अथवा हे यश म्हणजे ते अंतिम यश न मानता पुन्हा मार्गक्रमण करीत राहतात. कारण यश हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाचा आनंद लुटत यशाचे टप्पे ओलांडत पुढे जातात.
ही यशस्वी माणसे कायम विजेत्याच्या भूमिकेत वावरत असल्याने आजूबाजूची परिस्थिती आपोआप त्यांच्यासाठी अनुकूल अशीच होत जाते. सकारात्मक भूमिका ठेवून आनंदी वातावरणाचा विचार जेव्हा ही व्यक्ती करते तेव्हा आजूबाजूचे सर्व लोक तसेच परिस्थितीही सकारात्मक होऊन आनंदी होतात म्हणून यशस्वी होणे अथवा अपयशी होणे हे सर्वस्वी आपणावर अवलंबून आहे. या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय आपण स्वीकारावा हे आपणच ठरवायचे आहे.
सकारात्मक विचाराची गुरुकिल्ली ही आपल्या विचारात आहे. कोणत्याही परिस्थितीत चांगली बाजू पाहण्याची शक्ती म्हणजेच सकारात्मक भूमिका आणि अशी सकारात्मक ज्यांच्या अंगी आहे तेच यशस्वी होतात. म्हणूनच असे म्हटले आहे की, success lies in persons determination.
तरीसुद्धा हा विचार ही पहिली पायरी आहे आणि ही पायरी चढलात नाही तर पुढील मार्ग आपणास सापडणार नाही आणि जेव्हा ही पायरी चढाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की विचार- कृती- सवय आणि परिणाम यांचा सहसंबंध चांगला विचार करून त्याप्रमाणे कृती केलीत व त्या चांगल्या कृतीची नेहमी सवय ठेवली (सातत्य म्हणजे अभ्यास हे येथे वेगळे सांगायला नको) तर नक्कीच चांगला परिणाम दिसणार आहे म्हणजे यश हे तुमच्या पदरात पडणार आहे. आणि जेव्हा दुसऱ्या कृतीची पायरी चढायला जाल तेव्हा त्यामधील वेळेचे महत्त्व तुमच्या लक्षात येईलच वेळेचे व्यवस्थापन हे एक यशस्वी होण्याच्या मार्गावरील एक उत्तम कसब आहे आणि हे कसब जर अंगी आणले तर यशाची पायरी लवकर चढता येईल. वेळेचे व्यवस्थापन योग्य रितीने अंगीकारले तर तुम्ही तुमचा ताण कमी करून आणखी उत्पादनक्षम (Productive) व्हाल त्याचबरोबर तुम्ही तुमच्या आदर्शाचा दबदबा निर्माण करू शकाल व तुमचे ध्येय गाठण्यास तुम्हास हातभार होईल तसेच व्यवस्थित, सुंदर व यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल.
यशाची व्याख्या वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळी आहे म्हणजेच एखाद्या शिक्षकाला आपले विद्यार्थी चांगले गुण मिळवीत आहेत हे पाहण्यात तर एखाद्या व्यावसायिकाला व्यवसायातील स्पर्धेत अग्रेसर राहण्यात यश दिसेल तर एखाद्या कलाकारासाठी यशाची व्याख्या आणखी वेगळी असेल.
कृती : विचार- कृती- सवय- परिणाम या समीकरणाचा विचार करताना चांगली कृती झाली व त्या कृतीत सातत्य असेल तर म्हणजे त्या चांगल्या कृतीचे चांगल्या सवयीत रूपांतर होईल. याचे परिणाम देखील मनाजोगे म्हणजेच चांगले दिसतील आणि याच संगमाला यश म्हणता येईल.
सवय : चांगल्या कृतीत सातत्य राखल्यास साहजिकच त्याचे रूपांतर चांगल्या सवयीत होईल आणि या सवयी वेळेनुसारच होत असतात म्हणूनच या वेळेचे व्यवस्थापन योग्य प्रकारे व्हायला हवे. या चांगल्या सवयीतून यशोशिखरावर जाण्याचा राजमार्ग मिळणार आहे. एखादी व्यक्ती ध्येयपूर्ती करते म्हणजे यश गाठते तेव्हा ती त्या यशोशिखरावर काही काळापूर्तीसाठीच असते म्हणजे हे यश काही काळापुरतेच असते. तो एकटा आहे हे त्या ध्येयावर पोहोचल्यावर त्याला उमगते. यशस्वी होण्यासाठी तुम्ही सतत क्रियाशील राहायला हवे त्याचे कारण म्हणजे यश हे कधीच तुमच्यासोबत राहत नाही, ते सतत गतीशील राहते.
यश हे मूलत: ध्येय, एकाग्रता, मेहनत व चिकाटी, निश्चय, समर्पण व नियोजन या गोष्टींवर अवलंबून आहे.
म्हणजेच हेच पाहा ना जर तुम्हाला डॉक्टर व्हायचे असेल तर ते तुमचे ध्येय होय. यशस्वी डॉक्टर म्हणून नाव कमवायचे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यासाठी तुमची एकाग्रता ही यशस्वी डॉक्टर होण्यासाठी असायला हवी. यासाठी मेहनतीशिवाय कोणताच मार्ग नाही व चिकाटी ही मेहनतीसाठी फार गरजेची आहे. त्यासाठी तुम्हाला स्वत:वर विश्वास असायला हवा आणि निश्चय केलेला हवा की, मी निवडलेल्या क्षेत्रात कायम अत्युच्च शिखर गाठेन आणि यासाठी समर्पण आवश्यक आहे तसेच या सर्व गोष्टींसाठी नियोजन ही बाब फार महत्त्वाची ठरते.
वेळेचे व्यवस्थापन
या जगात सर्वानाच सारखा वेळ विधात्याने दिलेला आहे. कोणालाही दिवसाचे २५ तास दिलेले नाहीत. असे असूनही काहीजण यशस्वी तर काही अपयशी का होतात? तर याचे मूळ कारणच वेळेचे व्यवस्थापन या घटकाशी निगडित आहे. जो आपणास मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करतो तो यशस्वी होतो व हे ज्याला जमत नाही ते अपयशी ठरतात. हे साधे समीकरण यामागे आहे म्हणूनच म्हणतात ना,
समय ही जीवन है।
समय को बरबाद करना
अपने जीवन को बरबाद करना है।
कोणीही आजचा वेळ उद्यासाठी वाचवून ठेवू असे म्हणून तो बचत करू शकत नाही. फक्त त्या वेळेचा तो योग्य प्रकारे उपयोग करू शकतो. लक्षात घ्या, आपल्या वेळेचा आपल्यापेक्षा कोणीही योग्य प्रकारे वापर करू शकत नाही. काहीजण वेळेचे बंधन पाळून आपले जीवनमान उंचावतात तर काहीजण वेळेचे गुलाम होऊन बसतात (गुलाम म्हणजे असे म्हणणारे की ‘आज माझी वेळ खराब आहे, नंतर बघेन.’)
काहीजणांना मुळात ‘रिलॅक्स’ होण्यासाठी जराही वेळ नसतो तरीसुद्धा ते तणावरहित जीवन जगत असतात. तरीसुद्धा कोणीही वेळेला शत्रू बनवू नये.
वेळ ही फार महत्त्वाची बाब प्रत्येकासाठी आहे. काही वेळा तर वेळ हीच सर्वस्व बनून बसलेली असते. वेळ फक्त त्यांचाच मान राखते जे वेळेचा मान राखतात. वेळ ही आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बाब असून आपल्या प्रगतीत तसेच उन्नतीसाठी ती फार महत्त्वाची भूमिका बजावते. फक्त तिचा वापर कसा करावा याचे ज्ञान व्हायला हवे; तरच आपण जास्तीत जास्त गोष्टी जलद मिळवू शकता. ‘वेळेचा योग्य वापर’ ही बाबच बऱ्याच जणांसाठी एक समस्या बनलेली असते. यासाठी वेळेचे व्यवस्थापन हाच एक योग्य उपाय आहे; परंतु त्यांसाठी ही समस्या असते त्यांना याबाबत काही गैरसमजुती त्यांच्या मनातच असतात. त्या म्हणजे वेळेचे व्यवस्थापन ही एक साधी गोष्ट असून त्यासाठी वेगळे प्रयत्न कशाला करायला हवेत? दबावाखाली असलो की व्यवस्थित काम करतो तर मग मी वेळेचे नियोजन कशासाठी करू? मला तर वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठीही वेळ नाही तर मी वेळेचे नियोजन कसे करू; परंतु सत्य हे आहे की वेळेचे व्यवस्थापन ही जीवनातील करिअरसाठी एक गुरुकिल्ली आहे. वेळेच्या व्यवस्थापनामुळे आपल्या कार्यक्षेत्रात व जीवनात बऱ्याच गोष्टींचा वापर करण्याचे ज्ञान प्राप्त होते.
‘वेळ कोणासाठी थांबत नाही’ तसेच ‘गेलेली वेळ परत येत नाही’ म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळेचे योग्य नियोजन केले तर काम भरपूर आहे, पण वेळ मिळत नाही हे म्हणण्याची वेळ येणार नाही. यामुळेच प्रत्येकाने पुढील सूचनांचा उपयोग करून पाहावा.
स्वत:पासून सुरुवात करून विचार करायला हवा की आपण अमूल्य असा वेळ कसा वाया घालवतो ते. तसेच प्रत्येकाने वर्षांचे, महिन्याचे, आठवडय़ाचे तसेच दिवसाचे ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत कसे जायचे याचे नियोजन करायला हवे.
कामांचा अग्रक्रम ठरवा. महत्त्वाच्या कामांसाठी वेळ, त्यानंतरची कमी महत्त्वाची कामे असा अग्रक्रम ठरवायला हवा.
अनावश्यक कामांना प्राधान्य न देता महत्त्वाची कामे अगोदर पूर्णवेळ करणे. कामाची विभागणी करून प्रत्येक कामासाठी योग्य वेळ ठरवणे.
रोजच्या कामांसाठी एक छोटी डायरी करून कामांचा अग्रक्रम ठरवा.
वेळेचा योग्य वापर केला तर वेळ ही सर्वात अमूल्य बाब आहे. हे यशस्वी लोकांना पटल्याने ते यशस्वी झाले आहेत.
जवळपास १०० वर्षांहून अधिक काळापासून वेळेचे व्यवस्थापन ही कल्पना अस्तित्वात असून त्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही एक कला आहे. वेळेचे व्यवस्थापन ही कल्पना समजण्यास सोपी असून बजावणीस फार अवघड आहे. आईनस्टाईनने वेळेबाबत म्हटले आहे की, ‘‘जर मला एखादे काम करण्यास एक तास दिला तर ते काम कसे करावे याच्या नियोजनासाठी मी ५० मिनिटे वापरीन.’’ यावरून नियोजनाला किती महत्त्व आहे हे लक्षात येतेच. आपल्या कामांची आखणी करून एका कागदावर लिहून घ्या. नंतर त्या ध्येयपूर्तीकडे कसे जाता येईल याच्या पायऱ्या तयार करा. खरोखर महत्त्वाचे व तात्काळ गरजेचे तसेच कमी महत्त्वाचे परंतु तात्काळ गरजेचे नाही यातील योग्य फरक ओळखून त्याप्रमाणे आखणी करा.
जर तुम्ही यापूर्वी कधीही वेळेचे व्यवस्थापन केले नसेल तर तशी आखणी करण्यास आपणास काही वेळ लागेल; परंतु एकदा
तुम्ही हे योग्य प्रकारे करू शकलात तर तुम्ही निश्चितच तुमच्या ध्येयाकडे जलद पोहोचाल व यशस्वितांच्या यादीत तुमचेही नाव जोडाल.

यशाची गुरूकिल्ली

यशाची रूपे अनेक आहेत त्यामुळेच यशाच्या व्याख्याही अनेक आहेत.
यशाचा सतत विचार ही यशाची पहिली पायरी आहे.
यश हा एक प्रवास आहे आणि या प्रवासाचा आनंद लुटत यशाचे टप्पे ओलांडत पुढे जायचे असते.
वेळेचे व्यवस्थापन हे एक यशस्वी होण्याच्या मार्गावरील एक उत्तम कसब आहे.
यश हे मूलत: ध्येय, एकाग्रता, मेहनत व चिकाटी, निश्चय, समर्पण व नियोजन या गोष्टींवर अवलंबून आहे.
प्रा. संजय मोरे
९३२२३५०४६६
(लेखक हे मुंबई विद्यापीठातील बहि:शाल विभागात गणिताचे अध्यापन करतात.)