Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
व्यापार-उद्योग

नॉर्थ कॅनरा बँकेचा पुण्यात शाखाविस्तार
व्यापार प्रतिनिधी: सहकार क्षेत्रातील नामांकित अशा ‘एनकेजीएसबी’ बँकेने पुणे शहरात पदार्पण केले असून कोथरूड येथे बँकेच्या पुण्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. शानभाग यांचे हस्ते झाले. ९१ वर्षांची परंपरा असलेल्या ‘ऐनकेजीएसबी’ बँकेची आजमितीस २८०० कोटी रुपयांची उलाढाल असून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक येथे ३१ शाखा कार्यान्वित आहेत. स्थापनेपासून दरवर्षी सातत्यपूर्ण नफा, प्रतिवर्षी ‘ए’ वर्ग ऑडिट व नेट एनपीए ० टक्के ही बँकेची वैशिष्टय़े विशद करताना बँकेचे उपाध्यक्ष के. डी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘आमच्या व्यवसायवृद्धीच्या धोरणानुसार या आर्थिक वर्षांत कोल्हापूरच्या श्री शाहू बँकेचे विलीनीकरण करण्यात आले.

कामगारांच्या सहकार्यामुळेच पोर्ट ट्रस्टच्या व्यापारात विक्रमी वाढ - अशोक कुमाल बल
व्यापार प्रतिनिधी: कोणत्याही उद्योगात कामगार व मालकांचे महत्त्वाचे नाते असते. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मी प्रथम कामगार म्हणून रुजू झालो, तेव्हा माझ्या बौद्धिक, शारीरिक क्षमतेचा पूर्ण वापर करून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या व्यापारात विक्रमी अशी वाढ केली. ही विक्रमी वाढ केवळ कामगारांच्या सहकार्यामुळेच झाली, असे गौरवपर उद्गार मुंबई पोर्ट ट्रस्टचे डेप्युटी चेअरमन अशोक कुमार बल यांनी सत्कराला उत्तर देताना काढले.

५० लाख भारतीयांपर्यंत ‘फिनो’च्या सेवाजाळ्याचा विस्तार
व्यापार प्रतिनिधी: समाजातील बँकिंग क्षेत्रापासून दूर राहिलेल्या तसेच कमी प्रमाणात या सेवा प्राप्त करणाऱ्या घटकांना सेवा देणारी एक आघाडीची वित्तीय संस्था (एफआय) असलेली फायनान्शिअल इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड ऑपरेशन्स लि. (फिनो) या संस्थेने ५० लाख ग्राहकांना मूलभूत बँकिंग व विमा सेवा देऊ केल्या आहेत. सुरुवातीपासूनच, देशात बँकिंग क्षेत्रापासून दूर असलेल्या नागरिकांने बँकिंग सेवा देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या फिनोने भारताचे बँकिंग रडार मजबूत करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. फिनोची घोडदौड वेगाने सुरू असून आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक, आयसीआयसीआय बँक, आयसीआयसीआय लोम्बार्ड, ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सेवा बँक तसेच अन्य वित्तीय संस्थांसमवेत सध्या फिनो कार्यरत आहे.

‘अ‍ॅमवे’ची प्रतिबंधक आरोग्य सेवेसाठीची मोहीम
व्यापार प्रतिनिधी: भारतातील आघाडीची थेट विक्री कंपनी अ‍ॅमवे इंडियाने मुंबईत ‘स्वास्थ्य दर्पण’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. य विशेष करून आखण्यात आलेल्या उपक्रमाचा सर्व भर हा प्रतिबंधक आरोग्यसेवा आणि सकस आहर या गोष्टींवर असतो. ५००० हूनही अधिक अ‍ॅमवे वितरक आणि आम जनतेने या उपक्रमाचा लाभ घेतला. या विषयावरील ज्ञान लोकांपर्यंत तज्ज्ञ व्यावसायिकांच्या माध्यमातून पोहोचवण्याचे आणि त्याद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेतील महत्त्वाच्या घटकांचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट या आरोग्य परिषदांच्या आयोजनामागे असते.

‘अदानी विल्मर’कडून ‘फॉच्र्युन’ ब्रॅण्ड नव्या रूपात!
व्यापार प्रतिनिधी: अदानी विल्मर लिमिटेड ही आघाडीची खाद्यतेल उत्पादक कंपनी आपले सध्याचे ब्रँड्स नव्या रूपात आणण्यासाठी आणि नवी उत्पादने दाखल करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने २००० साली फॉच्र्युन हा ब्रँड दाखल करून ब्रँडेड पॅकेज्ड खाद्यतेल व्यवसायात प्रवेश केला. फोच्र्युन हा ब्रँड म्हणजे निरोगी, तरुण आणि शहरी कुटुंबाचे प्रतिबिंब आहे.

व्यापार संक्षिप्त
थ्रीजी डेटा कार्डासाठी बीएसएनएलचा मायक्रोमॅक्ससोबत करार

व्यापार प्रतिनिधी: सरकारी क्षेत्रातील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने त्यांचा थ्रीजी ब्रॉडबँड मोबाईल फोनच्या सेवेसाठी ग्राहकांना डेटाकार्ड विक्री आणि वितरण संदर्भात मोबाईल टेक्नॉलॉजीतील नामवंत कंपनी मायक्रोमॅक्ससोबत करार केला आहे. बीएसएनएल या वेळी ११ शहरांत ही सेवा देणार आहे आणि दोन-तीन महिन्यांत बीएसएनएल ७०० शहरांत थ्रीजी नेटवर्कचे जाळे पसरविणार आहे. मायक्रोमॅक्सचे निर्देशक विकास जैन म्हणाले की, या ७०० शहरांत थ्री जी कनेक्शनसोबतच ग्राहकांना थ्री जी डेटाकार्ड पुरविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.