Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

उदयनराजे कोटय़ाधीश
सातारा, १ एप्रिल/प्रतिनिधी

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माजी महसूल राज्यमंत्री उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना एकूण ११ कोटी ७२ लाख ५३ हजार ३४४ रुपये एवढी मालमत्ता प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केली आहे. मुंबई उच्च न्यायालयात एक खटला प्रलंबित आहे.
पत्नी श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसले व मुलगा श्रीमंत छत्रपती वीरप्रतापसिंहराजे भोसले यांच्या नावावर निरंक (कोणतीही मालमत्ता नसल्याचे) उदयनराजे यांनी जाहीर केले आहे.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या मालमत्तेच्या तपशीलामध्ये रोख ७ लाख ६८ हजार ३७५ रुपये, ठेवी ५ लाख ५९ हजार ३२९, रोखे ६ लाख ६ हजार १०४ रुपये, ४ वाहने ३४ लाख रुपये, दागदागिने ४९ लाख ८९ हजार ५५१ रुपये असे मिळून २ कोटी १७ लाख २ हजार २१५ रुपये.
स्थावर मालमत्तेमध्ये शेतजमीन ३ कोटी ७९ लाख ३१ हजार १६० रुपये, फ्लॅट्स २ कोटी ६४ लाख १३ हजार ६८५ रुपये व निवासी व्यापारी इमारती ३ कोटी १२ लाख ६ हजार २८४ असे मिळून ९ कोटी ५५ लाख ५१ हजार १२९ रुपये असा तपशील देण्यात आला आहे. वाहनांमध्ये मारुती जिप्सी, पजेरो, टोयाटो इनोव्हा, मारुती स्वीफ्ट या गाडय़ांचा समावेश आहे. त्यामधील पजेरो गाडीचे १८ लाखाचे कर्जाच्या बोजा असल्याचा तपशील देण्यात आला आहे.