Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मदन भोसले यांचा पाठिंबा उदयनराजेंना
वाई, १ एप्रिल/वार्ताहर

 

वाई खंडाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार मदन भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर व आनंदराव पाटील व शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यानंतर आ. भोसले यांनी हा निर्णय घेतला.
आसले (ता. वाई) येथे लोकसभा निवडणुकीतील निर्णय घेण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी शंकरराव गाढवे होते.
यापूर्वीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य करूनही प्रत्येक वेळी स्थानिक राजकारणात राषट्रवादी काँग्रेसशी लढत द्यावी लागते. सर्व विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यात येऊ नये, अशी भूमिका या मेळाव्यात व्यक्त करण्यात आली. बैठक सुरू असताना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पाटील व शिंदे यांचे आगमन झाले. त्यांनी कार्यकर्त्यांची मते समजून घेतली. यापुढे याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले व आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा द्यावा असे सुचविले. त्यानंतर आ. भोसले यांनी थेट वंशजांना पािठबा देण्यात येत आहे. त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. कार्यकर्त्यांचा मला पािठबा असल्याने पुढेही मला कोणाची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.