Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
प्रादेशिक
(सविस्तर वृत्त)

‘हृदय’ने राष्ट्रीय वसंत नाटय़महोत्सवाची आज सांगता
मुंबई, १ एप्रिल / प्रतिनिधी

 

मुंबई विद्यापीठाच्या अ‍ॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स या विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय वसंत नाटय़महोत्सवाचा समारोप समारंभ २ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता सांताक्रूझ (पू.) येथील विद्यानगरी कॅम्पसमधील मराठी भाषा भवनात पार पडणार आहे. विद्यापीठाच्या अॅकेडमी ऑफ थिएटर आर्ट्स विभागाची निर्मिती आणि श्याम मनोहर लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हृदय’ या नाटकाने महोत्सवाची सांगता होणार आहे. यावेळी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई व सिनेनाटय़ अभिनेत्री स्वाती चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या बी. सी. यू. डी. विभागाचे संचालक डॉ. व्ही. एन. मगरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी वा. पु. शिलारकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
गेले दहा दिवस सुरू असलेल्या या महोत्सवास नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमी आणि उदयपूर येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांचे सहकार्य लाभले. या महोत्सवात विवेक लागू दिग्दर्शित ‘तुला मी - मला मी’, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘हृदय’, प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’, विनायक दिवेकर दिग्दर्शित ‘अतिरेक्यांचे अध्याय आता नकोसे वाटतात’, राजू बारोट दिग्दर्शित ‘हाँ, मै तने चाहि छे जिंदगी’, मिलिंद इनामदार दिग्दर्शित ‘अजिंठा’, सतीश आळेकर लिखित - दिग्दर्शित ‘बेगम बर्वे’ व ‘महानिर्वाण’, सुधेशा व्यास दिग्दर्शित ‘अजीजन बाई’, बिस्वभूषण हरिचंदन दिग्दर्शित ‘कृतिभासा पट्टासनी’, शेखर सेन दिग्दर्शित ‘विवेकानंद’ आणि लोकेंद्र त्रिवेदी दिग्दर्शित ‘आजादी के तराने’ ही नाटके सादर केली.