Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

प्रचाराचा ज्वर चढू लागला
नागपूर, १ एप्रिल /प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असून यासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष

 

आणि संघटनांनी मेळावे, सभा, पदयात्रा व जनसंपर्क मोहिमांच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे.
बहुजन समाज पार्टी
नागपूर मतदारसंघातील बसपचे उमेदवार माणिकराव वैद्य यांच्या प्रचारार्थ कमाल चौकात सभा आयोजित करण्यात आली होती. डॉ.पी.एस. चंगोले सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी विवक हाडके, दिनेश चौबे, प्रकाश निमजे, कविता लांडगे, दिनेश अंडरसहारे, डॉ. शीतल नाईक, बुद्धम राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. संत जगनाडे चौकात झालेल्या सभेत माणिकराव वैद्य यांनी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून स्कूटर रॅलीचा शुभारंभ केला. रॅलीध्ये स्वता वैद्यदेखील सहभागी झाले होते. रॅलीत अरविंद मेश्राम, पृथ्वीराज शेंडे, विश्वास राऊत, भाऊराव सोनपिपळे, नरेश सोमकुवर, जितेंद्र मेश्राम, शिवा चौसरे यांच्यासह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते हिरीरीने सहभागी झाले.
नागपूर शहर काँग्रेस सेवादल
अखिल भारतीय सेवादलाचे प्रमुख संघटक महेंद्र जोशी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला नागपुरातून सुरूवात केली. काँग्रेस आघाडीचे नागपूर मतदारसंघाचे उमेदवार विलास मुत्तेमवार व रामटेकचे उमेदवार मुकुल वासनिक यांचा निवडणूक अर्ज दाखल करतेवेळी जोशी त्यांच्यासोबत होते. यावेळी कृष्णकुमार पांडे, यशवंत कुंभलकर, शांतीलाल गांधी, अशोक वानखेडे, रमेश नांदे, प्रभुदास तायवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. मध्य नागपुरात नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष जयप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत काँग्रेसचे नागपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार विलास मुत्तेमवार यांना विजयी करण्याचा संकल्प सोडण्यात आला. सभेमध्ये काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष यादवराव शिरपुरकर, रवींद्र दुरुगकर, कांता पराते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुरोहितांना पाठिंबा
अखंड महाराष्ट्र समितीने भाजप-सेना युतीचे नागपुरातील उमेदवार बनवारीलाल पुरोहित यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बनवारीलाल पुरोहित हे युतीतर्फे एका राष्ट्रीय पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यातील घटक पक्ष शिवसेना अखंड महाराष्ट्रवादी आहे. ही बाब लक्षात घेऊन संघनटेने पुरोहित यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस
रामटेक मतदारसंघाचे काँगेस, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मुकुल वासनिक यांच्या प्रचारार्थ मौदा तालुक्यातील तारसा येथे झालेल्या सभेत सुबोध मोहिते यांनी वासनिकांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मौदा वीज प्रकल्पामुळे स्थानिकांना रोजगाराच्या मोठय़ा संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा केला. सभेला सचिन किरपान, महेश हटेवार, बाळकृष्ण खंडाईत, प्रकाश निमकर, मदन बरबटे, मनोज नौकरकर, शिन्नुजी मल्लय्याजी, सदानंद कुंभलकर आदी उपस्थित होते.
मुकुल वासनिक यांनी सावनेर तालुक्यातील विविध गावांचा दौरा केला. दहेगाव, खापरखेडा, वलनी, पिपळा, पाटनसावंगी, वाकोडी, कोथुळना, बडेगाव, खैरी, केळवद, नांदा आदी गावांमध्ये त्यांच्या प्रचार सभा झाल्या.