Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

डॉ. श.नू. पठाण यांचे आज एज्युसॅटवर व्याख्यान
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेमधील जीवन शिक्षण अभियान या ३९ व्या अध्यायावर

 

आधारित अनेकविध कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्यात आलेले आहेत. यांची नोंद नवी दिल्ली येथील \Consortium for Educational Commnuication (CEC) या राष्ट्रीय केंद्राने घेतली असून कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण यांचे या विषयावरील व्याख्यान उद्या, २ एप्रिलला, दुपारी ४.३० वाजता नवी दिल्ली येथून \EDUSAT या शैक्षणिक उपग्रहावर प्रसारित होणार आहे.
सदर कार्यक्रम देशात एकूण १७ एज्युकेशन मिडीया रिसर्च सेंटर आणि ७० सॅटेलाईट इन्सर्ट टर्मीनलवर दाखवण्यात येणार आहे. तसेच उत्तर-पूर्वेकडील राज्यातील सर्व केंद्रांवर हा कार्यक्रम पाहता येईल. कुलगुरू पठाण यांच्याशी या सर्व केंद्रांवरून विद्यार्थी थेट प्रश्न विचारून अधिक संवाद साधू शकतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि त्यावर आधारित असलेला शैक्षणिक उपक्रम हा प्रथमच देशपातळीवर जात आहे. ल्ल
आजपासून संगीत व कृतीमय भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सप्ताह
नागपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी
हनुमान मंदिर पंचकमेटी जुनी वस्ती खामलाच्या वतीने २ ते ९ एप्रिलपर्यंत संगीत व कृतीमय श्रीमद भागवत महापुराण ज्ञानयज्ञ सप्ताह व पतंजली योग शिबीर आयोजित करण्यात आले आहे. ह.भ.प. खराटे महाराज यांचे शिष्य ह.भ.प. संजय केतकर महाराज भागवत कथा सादर करतील. कार्यक्रमाचे उद्घाटन यशपाल आर्य व स्नेहलता आर्य यांच्या हस्ते उद्या, २ एप्रिलला पहाटे ५.३० वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. गिरधर कोडवाणी, डॉ. संजय धामेजा, आमविलास सारडा, संजय खोडे, शोभा भागिया, प्राचार्य रजनी डहाके उपस्थित राहतील.
सकाळी ९ वाजता कलश स्थापना व भागवत सप्ताह प्रारंभ होईल. २ एप्रिलपासून दररोज सकाळी ५.३० ते ७ वाजेपर्यंत पतंजली योग शिबीर, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत भागवत सप्ताह, संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत भागवत कथा सादर होईल. गुरुवार ९ एप्रिलला दुपारी १० ते १२ वाजेपर्यंत गोपाल काल्याचे कीर्तन व दुपारी १ ते ५ पर्यंत महाप्रसाद वितरण करण्यात येईल. सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात माजी खासदार दत्ता मेघे, आमदार देवेंद्र फडणवीस, महापालिकेचे सत्तापक्ष नेते अनिल सोले, समीर मेघे, धीरज पराते, नगरसेवक प्रकाश तोतवाणी, भगवान धामणे, सिंधी समाज अध्यक्ष नारायण आहुजा, होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. विलास काळे, डॉ. राजू काळे, श्रीकांत ओक, विनोद जेठाणी, ह.भ.प. नाफडे महाराज, प्राचार्य रजनी डहाके उपस्थित राहतील. भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.