Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

‘भूक से बचाव’ कार्यक्रमात अंधांना शिष्यवृत्तीचे वाटप
नागपूर,१ एप्रिल / प्रतिनिधी

नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाईंड संस्थेच्यावतीने ‘भूक से बचाव’ कार्यक्रम अंध विद्यार्थ्यांना

 

शिष्यवृत्तीच वाटप करण्यात आले. अमृत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विदर्भातील सुमारे ६०० स्त्री-पुरुष उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम दातीर, अ‍ॅड. संतोष रुंगठा, संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एल. देशपांडे उपस्थित होते.
अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी यांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा करून योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. पुरुषोत्तम दातीर यांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सर्व स्तरावर बातमी पोहचवण्यात येईल, असे आश्वासन दिले. अ‍ॅड. रुंगठा यांनी सरकारच्या विविध विभागामधील अंधांचा अनुशेष अजूनही भरला गेला नसल्याची माहिती देत त्याकरिता लवकरच न्यायालयात जाऊ, असे सांगितले. ‘भूक से बचाव’ कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील २०० अंध व गरजू व्यक्तींना प्रत्येकी एक हजार रुपयाचे वाटप करण्यात आले. तसेच, १३० अंध विद्यार्थ्यांना प्रत्येकी ९ हजार रुपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रेवाराम टेंभूर्णीकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता विदर्भाचे महासचिव मनिष थूल, गजानन पोपळघट, बादल कापसे, अनिल गोलाईत, देवराव लिचडे, आशा टेंभूर्णे, डॉ. अमोल राऊत आदींनी सहकार्य केले.