Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

स्नेहल पत्की यांचे सुश्राव्य गायन
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

श्रद्धानंदपेठेतील श्री हनुमान मंदिर देवस्थानतर्फे श्रीराम आणि हनुमान जन्मोत्सवानिमित्त स्नेहल

 

पत्की यांच्या सुश्राव्य सुगम संगीताचा कार्यक्रम रविवार, २९ मार्चला मंदिराच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात स्नेहल पत्की यांनी भावगीत, भक्तिगीत, नाटय़गीत इत्यादी एकूण ११ गाणी सादर केली. स्वतंत्रपणे सादर केलेला स्नेहलचा हा पहिलाच कार्यक्रम होता.
कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागेश्वरी’ या गीताने झाली. यानंतर स्नेहलने ‘मागे उभा मंगेश’, ‘रखूमाई पांडुरंग’, ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘राम भजन कर मन’, ‘बाजे रे मुरलिया बाजे’ ही भक्तिगीते सादर केली. ‘मर्म बंधातली ठेव ही’ व ‘खरा तो प्रेमा’ या नाटय़गीतांनी कार्यक्रमात जान आणली.
स्नेहलने ‘पाण्यातले पाहता प्रतिबिंब हे हासणारे’ व ‘मी राधिका’ ही भावगीते सादर करून प्रेक्षकांची मनेजिंकून घेतली. ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहलला हार्मोनियमवर प्रशांत उपगडे यांनी तर तबल्यावर मंगेश पौनीकर यांनी साथ केली. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन सुषमा गोखले यांनी केले. प्रारंभी हनुमान मंदिर देवस्थान समितीचे उपाध्यक्ष शंकरराव फलटनकर यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. स्नेहल पत्की यांचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला मंदिर समितीचे सदस्य आणि परिसरातील संगीतप्रेमी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.