Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

बंद फाटकातून ट्रक दामटण्याचा प्रयत्न; चालक अटकेत, रेल्वे गेटमन निलंबित
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

‘कोल सायडिंग’कडे जाणाऱ्या मार्गावरील कोहळी-कळमेश्वर यादरम्यानचे रेल्वे फाटक बंद

 

असताना ट्रक चालकाने रस्ता पार करण्याच्या प्रयत्न केल्याने येथे कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला (गेटमन) कामात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याचे नाव लक्ष्मी प्रसाद असे आहे.
ट्रक चालक उमेश बलभद्रसिंग (सुलतानापूर, उ.प्र.) याला रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. आज त्याला रेल्वे न्यायालयातून चार हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
काल, दुपारी कोहळी-कळमेश्वर रेल्वे फाटक बंद असताना ट्रक चालकाने (सीजी ०४-९३६३ फाटकाच्या ‘गॅप’मधून वाहन काढण्याचा प्रयत्न केला. पंरतु, ट्रक तेथे फसला. गँगमनने ट्रकच्या मागच्या चाकाची हवा काढली. तरीही ट्रकचालक न जुमानता वाहन पुढे दामटत होता. दरम्यान, स्टेशन मास्टरने (आर.पी.एफ.) याची माहिती संबंधितांना दिली आणि ट्रक चालकाला अटक करण्यात आली. कर्तव्यावर असताना चालकाने ट्रक फाटकात घुसवलाच कसा? असा प्रश्न उपस्थित करून रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेने ‘गेटमन’ला निलंबित केले.