Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राजे जयसिंह यांचाही शिवसेनेत प्रवेश
नागपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

राजे मुधोजी भोसले यांचे चिरंजीव राजे जयसिंह यांनीही त्यांच्या समर्थकांसह अलीकडेच शिवसेनेत

 

प्रवेश केला. पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख विनायक राऊत, खासदार प्रकाश जाधव, आमदार आशीष जयस्वाल, जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे, उपमहापौर किशोर कुमेरिया आदींनी राजे जयसिंह यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
पक्षात तरुणांना काम करण्यास बराच वाव आहे. राजे जयसिंह यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करून, लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातील युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांना विजयी करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करावे, असे आवाहन विनायक राऊत यांनी केले. पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास पूर्व विदर्भ सहसंपर्क प्रमुख रमेश बक्षी, जिल्हा संपर्क प्रमुख छोटू देसाई, विनोद घाटे आणि उपप्रमुख दिवाकर पाटणे उपस्थित होते.
सेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये अनिल मोहिते, प्रवीण पाटील, अर्पित माने, राजेश चव्हाण, विक्रम जाधव, राहुल सूर्यवंशी, प्रमोद पाटील, आनंद पेटले, प्रशांत हुलके, आशीष चव्हाण, बॉबी महाकाळकर, महेंद्र सोनबावने, सचिन दहीकर, अमित सपाटे, यशवंत डहाके, चेतन आंबटकर, राहुल दामनकर, अजिंक्य दामनकर, अनिल मोहिते, अविनाश इंगळे, गोलू नांदुरकर, श्रुती भुते, मनोज कंगाले, प्रमोद यादव, ओमदेव आजबले, कुणाल मोरघडे, मनोज लिखार, मनोज पडोळे, दिनेश गजबे आदींसह आनंदनगर, सुदामपुरी, ओमनगर, रमना मारोती, नरसाळा या भागातील शंभरहून तरुणांचा समावेश आहे.