Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

एचबी इस्टेटमधील चोरी; सराफासह दोघांना अटक
२ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त
नागपूर, १ एप्रिल / प्रतिनिधी

एचबी इस्टेटमधील एका घरात झालेल्या चोरीप्रकरणी सराफासह दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून संपूर्ण ऐवज जप्त केला.
एल्वीन मार्टीन गोम्स जो मार्टीन गोम्स (रा. एचबी इस्टेट) हे २० फेब्रुवारीला सकाळी अकरा

 

वाजताच्या सुमारास घराला कुलूप लावून व्यवसाय निमित्ताने हॉटेल सेंटर पॉइर्ंटमध्ये गेले होते. अज्ञात आरोपीने त्याच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून रोख १३ हजार ५०० रु., सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी.टी. इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यवर्ती कारागृहात असलेलाआरोपी सत्यपाल उर्फ सत्या पुनाराम नागपुरे २४ मार्चला ताब्यात घेऊन अटक केली. या ठिकाणी चोरलेले दागिने बुटीबोरी येथील सौभाग्य अलंकार ज्वेलर्सला विकले होते. त्या दुकानाचा मालक आरोपी दिनेश जनार्दन कावरे (रा. बुटीबोरी) अटक करून सोन्याच्या दोन अंगठय़ा व सोने असा एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.