Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वनबंधू परिषदेतर्फे शनिवारी हनुमान चालीसा महापठण
प्रतिनिधी / नाशिक

 

येथील वनबंधू परिषदेच्यावतीने येत्या शनिवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत सव्वा कोटी हनुमान चालीसा महापाठ या प्रकल्पाअंतर्गत ५०० हून अधिक साधकांच्या सामुहीक हनुमान चालीसा महापाठाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, नेमीचंद पोद्दार आणि सुनिल चांडक यांनी दिली.
उज्जन येथील जीवन प्रबंधन समुहाने केलेल्या संकल्पानुसार ४ एप्रिल रोजी भारतासह संपूर्ण जगामध्ये एकाच वेळेस सव्वा कोटी हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार आहे. त्यानुसार हा कार्यक्रम येथील निर्माण हाऊसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या एका तासापैकी पहिल्या १५ मिनिटांत भारतासह सर्व विश्व धर्मगुरूंचे हनुमान चालीसाबद्दल विचार प्रसारित केले जातील. दुसऱ्या १५ मिनिटांत हनुमानचालीसावरील विद्वान पंडित विजय शंकर मेहता यांते व्याख्यान होणार असून, उर्वरित वेळात सात मिनीटांच्या दोन भागात सर्व साधक एकाच वेळेस एका सुरात आणि एकाच धूनमध्ये हनुमान चालीसाचे पठण करतील. यानंतर प्राणायाम, ध्यान आणि योगसंदर्भात संक्षिप्त क्रिया दाखवली जाणार आहे. या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रोकॉडस् आणि लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये नोंद होण्यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आलेली आहे. जगभरात हनुमान चालीसाचे महत्व समजावे या हेतुने आयोजित या विश्वविक्रमी महापाठामध्ये सहभागी होण्यासाठी ९८२२२६१८४० या क्रमांकावर संपर्क साधावा तसेच उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन रामरतन कारवा,
अशोक तापडिया, प्रदिप बूब, लक्ष्मीनारायण कलंत्री, संजय मुंदडा यांनी केले आहे.