Leading International Marathi News Daily
गुरुवार, २ एप्रिल २००९
राज्य

तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाची चाळिशी
नीरज पंडित
तारापूर अणुऊर्जा केंद्र, १ एप्रिल

तारापूर अणुऊर्जा केंद्र हा ४० वष्रे अविरत काम करीत असलेला जगातील एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असून भारतासाठी हा विशेष प्रकल्प असल्याचे मत अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त करतानाच, अणुऊर्जा प्रकल्पांचे नवे आव्हान पेलण्यासाठी अनेक धडे या प्रकल्पामुळे मिळाल्याचेही नमूद केले.

पवार व भुजबळ आज विदर्भात
बुलढाणा/ अमरावती, १ एप्रिल / प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ उद्या, २ एप्रिलला विदर्भात प्रचारासाठी येत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी सकाळी १० वाजता मेहकर येथे तर दुपारी १ वाजता खामगाव येथे जाहीर प्रचार सभा होणार आहे.

नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टर्स जाळले
* दोन वन कर्मचाऱ्यांना मारहाण
* नक्षलवाद्यांचे बॅनर्स-पत्रके जप्त

गडचिरोली, १ एप्रिल / वार्ताहर

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत नक्षलवाद्यांकडून जाळपोळ सुरू असून बुधवारी पहाटे धानोरा तालुक्यातील मोहली येथे दोन ट्रॅक्टर्स ट्रॉलीसह जाळून लाखो रुपयांचे नुकसान केले. तत्पूर्वी नक्षलवाद्यांनी तेथील दोन वन कर्मचाऱ्यांना जबर मारहाण केल्याने त्यांना धानोरा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहली येथे जंगल कामगार सहकारी संस्थेच्या जळाऊ लाकडांची वाहतूक करण्याचे काम सुरू आहे.

चंद्रपुरात सापडला दुर्मिळ नाण्यांचा साठा
चंद्रपूर, १ एप्रिल/ प्रतिनिधी

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बाजूला बुधवारी खोदकाम सुरू असताना दुर्मिळ नाण्यांचा साठा सापडला. पोलिसांनी जप्त केलेली ही नाणी मोगलकालीन राजवटीतील असावी, असा अंदाज इतिहास अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. येथील परिवहन कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळय़ा जागेत वाहने उभी करण्यासाठी तसेच फिरवण्यासाठी जागा तयार करण्याचे काम सुरू आहे.

पुगलिया करोडपती, खरतड ‘रोडपती’!
हंसराज अहीर यांच्यावर आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे
चंद्रपूर, १ एप्रिल/प्रतिनिधी
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या एकूण २८ उमेदवारांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस-रिपाई युतीचे नरेश पुगलिया करोडपती तर लोमेश खरतड सर्वात गरीब उमेदवार आहेत. भाजपचे विद्यमान खासदार हंसराज अहीर यांच्यावर आंदोलनाचे सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. या मतदारसंघात २८ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.

रायगडमधील ग्रामपंचायतींची कोटय़वधींची थकीत पाणीपट्टी उमेदवारांच्या डोळ्यांत आणणार पाणी !
अलिबाग, १ एप्रिल/वार्ताहर
रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत तर ४ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. त्या दिवसानंतर गावागावांतील प्रचारास वेग येईल़ कोकणच्या विकासाचा मुद्दा घेऊन सर्वसाधारणपणे सर्वच पक्ष मतदारांपर्यंत पोहोचणार आहेत.

वाढत्या झुंडशाहीविरुद्ध व्यासपीठ स्थापन होणार
विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय
पुणे, १ एप्रिल/ प्रतिनिधी
समाजातील वाढत्या झुंडशाहीविरुद्ध एक व्यासपीठ स्थापन करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. लेखक, साहित्यिकांनी या व्यासपीठाला पाठिंबा द्यावा यासाठी त्यांच्याकडे व्यासपीठ स्थापन करण्यामागील भूमिका विशद करणारे पत्र पाठविण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.

रजेगावजवळ अपघातात तिघे ठार
गोंदिया, १ एप्रिल / वार्ताहर

गोंदिया-बालाघाट मार्गावरील रावणवाडी व रजेगाव दरम्यान मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात रजेगाव येथील तीन तरुण ठार झाले. रजेगाव येथील माणिकचंद तामराज रहांगडाले (२६), योगेश नत्थू बिसेन (२७) व देवेंद्र मयाराम बिसेन (२४) मंगळवारी धापेवाडा येथे एका लग्न समारंभात जाण्यासाठी गावावरून ७.३० वाजताच्या सुमारास मोटारसायकल (क्र. एम.एच.३५ एच. २१९२) ने निघाले. रजेगाव-गोंदिया मार्गावरील प्लायवुड फॅक्टरीसमोर त्यांच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की तिघेही घटनास्थळीच ठार झाले. दोघांच्या डोक्यांचा चेंदामेंदा झाला. रस्त्याच्या कडेला त्यांची मोटारसायकल पडलेली होती व तिघांचे मृतदेह रस्त्यावर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. तिघांच्या डोक्याला जबर मार होता. रस्त्याने जाणाऱ्या एका प्रवाशाने गावाजवळ अपघात झाल्याची माहिती दिल्यानंतर गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.