Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
नागपूरचे सावरकर पुण्याला
नागपूर, २ मार्च / प्रतिनिधी
नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत सावरकर यांची पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण

 

खात्यात बदली झाली आहे. लोकसभा निवडणूक निमित्ताने गृह मंत्रालयाने आज राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या.
श्रीकांत सावरकर यांच्या जागी कारागृहाचे (पूर्व विदर्भ) उपमहानिरीक्षक सुरिंदरकुमार यांना पाठवण्यात आले आहे. जवाहरसिंह यांना ‘म्हाडा’चे विशेष पोलीस महानिरीक्षक, विनोद लोखंडे यांना ठाणे येथे सहपोलीस आयुक्त, रितेशकुमार यांना मुंबई पूर्व येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त, रघुनाथ खैरे यांना परभणी येथे पोलीस अधीक्षक, शारदा निकम यांना कोल्हापूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक, शहाजी उमप यांना नांदेड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक तर, प्रवीण पवार यांना राज्य उत्पादन शुल्क खात्यात पाठवण्यात आले. ठाण्याचे पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांची नागपुरात बदली झाली आहे.
पोलीस आयुक्त प्रवीण दीक्षित यांनी शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पी.टी. इंगळे यांची सक्करदरा पोलीस ठाणे, बॉम्बशोधक व नाशक पथकाचे रामलखन यादव यांची तहसील पोलीस ठाणे, गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे हरिश्चंद्र रेड्डीवार यांची सीताबर्डी, गुन्हे शाखेचे एस.बी. पांडे यांची सदर पोलीस ठाणे, यशवंत घोडेकर यांची सोनेगाव पोलीस ठाणे तर, महेश्वर सिंह यांची कोराडी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली.