Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शिबिरात ८५ योग शिक्षकांना प्रशिक्षण
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

पतंजली योग समितीच्यावतीने वैशालीनगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित

 

करण्यात आलेल्या एक महिन्याच्या योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाला.
यावेळी समितीचे संरक्षक यशपाल आर्य, डॉ. शांतीलाल कोठारी, स्नेहलता आर्य, अध्यक्ष अ‍ॅड. नामदेव फटिंग, विदर्भ सेवा समितीचे अध्यक्ष डॉ. संतोष मोदी, हरगोविंद मुरारका, तोतडे गुरूजी उपस्थित होते. शिबिरात ८५ सहाय्यक योग शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. शिबिरातील उत्तम कामगिरीबद्दल राम आगाशे, सुभाष कुलश्रेष्ठ, मीना कुलश्रेष्ठ, प्रभाकर डाखोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. योग समितीचे उपाध्यक्ष मार्गेश्वर रंगारी, संघटन मंत्री प्रा. राम गावंडे, मंत्री छाजुराम शर्मा, कोषाध्यक्ष मनोहर नरोटे, हंसराज मिश्रा, संजय खोंडे, सोमनारायण पांडे, रुख्मा बहादुरे, माया रंगारी, संजय सोमकुंवर, भरतसिंग ठाकूर आदींनी शिबिराकरता सहकार्य केले. समारोप कार्यक्रमाचे संचालन राम आगाशे यांनी केले. दिलीप नरवडीया यांनी आभार मानले.
न्यू ठवरे कॉलनीतील शिबिराचे उद्घाटन
पतंजली योग समितीच्यावतीने न्यू ठवरे कॉलनी गार्डन येथे सात दिवसीय योग प्राणायाम शिबीर आयोजित करण्यात आले होते. नगरसेविका अर्चना शेंडे आणि अ‍ॅड. नामदेव फटिंग यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी माजी नगरसेविका रुख्मा बहादुरे, योग शिक्षक राम आगाशे, सुभाष कुलश्रेष्ठ, मीना कुलश्रेष्ठ, प्रभाकर डाखोरे, गुलाब उमाठे, सत्यभामा मेश्राम, अंकुश गजभिये उपस्थित होते. ५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.