Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पोलीस कुटुंबीयांना सेवा पुरवण्याच्या पॅनलवर
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांची महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालयातर्फे, राज्य सेवेतील सर्व

 

पोलीस प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सेवेकरता तसेच, पोलिसांच्या कुटुंबीयांना सेवा पुरवण्याच्या पॅनलवर निवड करण्यात आली.
यासोबतच बीएसएनएल एअरफोर्स, डब्ल्यूसीएल, एलआयसी, नीरी, रिलायन्स इन्शुरन्स, पॅरामाउंट, टीटीके या संस्थांमधील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सेवा पुरवण्याचे कार्य गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलकडे आहे. ५० खाटांचे हे हॉस्पीटल असून हृदयरोग, मधुमेह, मेंदू शस्त्रक्रिया, ट्रॉमा, स्त्री रोग, मूत्र विकाराशी संबंधित रोग, आकस्मिक विभाग, अपघात विभाग, विषग्रस्त रुग्णांवर औषधोपचार केले जातात. या सर्व सेवांचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी घ्यावा, असे आवाहन गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलतर्फे डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांनी केले आहे.