Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

झंकार महिला मंडळ व वेकोलि कल्याण समितीतर्फे आरोग्य शिबीर
३०० नागरिकांची
आरोग्य तपासणी
नागपूर, २ एप्रिल/ प्रतिनिधी

झंकार महिला मंडळ व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड कल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने व वेकोलिच्या आरोग्य विभागाच्या वतीने नि:शुल्क आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

 

वेकोलि मुख्यालयातील कोल क्लबमध्ये गुरुवारी आयोजित केलेल्या शिबिरात मानवतानगर, धोबीघाट, दूधडेअरी, गिट्टीखदान तसेच झोपडपट्टी परिसरातील सुमारे ३०० नागरिकांनी त्यांची आरोग्य तपासणी करून घेतली. प्रामुख्याने मधुमेह व हृदयरोग तपासणीकरता वोक्हार्ट हॉस्पीटलने सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन झंकार महिला मंडळाच्या अध्यक्ष शशी गर्ग यांनी केले. भविष्यातसुद्धा सामाजिक कार्यामध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. शकुंतला मिगलानी यांनी यावेळी सर्वाना शुभेच्छा दिल्या. वेकोलिचे ओ.पी. मिगलानी यांनी शिबिराला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. याप्रसंगी झंकार महिला मंडळाच्या उपाध्यक्ष शैलजा सक्सेना, शोभा प्रकाश, सचिव रूपा झा, लक्ष्मी नारायणा व पदाधिकाऱ्यांनी शिबिरातील लोकांना चादर, मिठाई व बिस्किटांचे वाटप केले.
कार्यक्रमाचे संचालन अर्चना सिंह यांनी केले. आभार पी.के. राधाकृष्णन यांनी मानले. कल्याण समितीचे सदस्य पी.पी. उपदेव, ए.के. ओबेराय, डी. घोष, पी. मोतेवार, कल्याण प्रभारी आर.एस. चौधरी, डॉ. रवी वाघमारे, डॉ. उषा रानी, डॉ. के. मोइत्रा, संध्या सिन्हा यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. आरोग्य शिबिराकरता वोक्हार्ट हॉस्पीटलचे महाव्यवस्थापक मुरली राव, डॉ. प्रमोद मुंदडा, डॉ. अनुज तिवारी, डॉ. अजिंक्य, विजयसिंह ठाकूर आदींनी सहकार्य केले.