Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९

बसपा, भारिप उमेदवारांचे अर्ज दाखल
प्रतिनिधी / नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी बसपाचे उमेदवार महंत सुधीरदास पुजारी आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी दीपक गांगुर्डे यांनी गुरूवारी शहरातून शोभायात्रा काढून आपली नामनिर्देशन पत्र दाखल केली. त्याचप्रमाणे भारिप-बहुजन महासंघाचे उमेदवार नामानंद महाराज (मातोरीकर) उर्फ नामदेव भिकाजी जाधव यांनीही दिंडीच्या माध्यमातून आपला अर्ज दाखल केला. बसपा उमेदवारांनी शिवाजी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बसपाच्या शोभायात्रेला सुरूवात केली तर भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली.

‘कल्पकतेतून विकास साधावा’
लोकसभेत मतदार आपल्या मतदारसंघाचा जो प्रतिनिधी खासदार म्हणून पाठवतात त्याला खरे तर संसदेत पोहचल्यानंतर काय काम करायचे असते त्यातीच जाण नसल्याचे अनेकदा आढळून येते. त्यामुळे खरे तर राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच हा प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यास लोकसभेतील कामकाजात भाग घेऊ शकेल का, तिथे चालणाऱ्या चर्चेत हा कितपत सहभागी होईल, देशापुढील आव्हाने, जागतिक स्पर्धा, देशादेशातील परस्पर संबंध, आयात-निर्यात, संरक्षण इत्यादी अनेक गंभीर स्वरुपाच्या समस्यांची याला जाणीव आहे का, या आणि अशा अनेक गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा.

‘हॅलकॉन’ प्रकल्पालाही विलंबाचे ग्रहण
प्रतिनिधी / नाशिक

कृषी व औद्योगिक मालाची परदेशात थेटपणे वाहतूक करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड आणि कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून नाशिक लगतच्या जानोरी येथे उभारण्यात आलेल्या हॅलकॉन कार्गो कॉम्प्लेक्स अर्थात मालवाहतूक सेवा केंद्र अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाली नसल्याने त्याचे अपेक्षित लाभ दृष्टीपथात येवू शकलेले नाहीत. उत्तर महाराष्ट्रातील निर्यातीला वेगळा आयाम प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या प्रश्नाकडे जवळपास सर्वच स्थानिक खासदारांनी दुर्लक्ष केले आहे.

कुठे आहे ग्राहक संरक्षण?
ग्राहक पंचायतीचा पालकमंत्र्यांना सवाल
प्रतिनिधी / नाशिक
ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत प्रशासन अतिशय उदासीन असून केवळ राष्ट्रीय ग्राहक दिन व जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यापलिकडे काहीच काम केले जात नसल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्र शासनाने मार्च २००५ मध्ये जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय सुमारे चार वर्ष उलटत असतानाही प्रत्यक्षात येऊ शकला नाही, तसेच नाशिक शहरातील वीज भारनियमन, रिक्षा मीटर अशा विविध मुद्दय़ांकडे लक्ष वेधत कुठे आहे ग्राहक संरक्षण, असा सवाल पंचायतीने उपस्थित केला आहे.

कापूस खरेदी व्यवहारात फसवणूक
प्रतिनिधी / नाशिक
नैसर्गिक आद्र्रतेपेक्षा अधिक आद्र्रतेचा म्हणजे ओला कापूस खरेदी करून ग्रेडरप्रमुखाने कापूस खरेदी केंद्राचे ७२ लाखाचे नुकसान केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कापूस खरेदी केंद्र व जिनिंग प्रोसेसिंग केंद्रातील कर्मचारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जळगाव येथील हेमराज एकनाथ बडगुजर येवला तालुक्यातील माधवराव पाटील सहकारी जिनिंग प्रोसेसिंग केंद्रात कंत्राटी ग्रेडरप्रमुख म्हणून कामाला असताना हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

दर्जेदार शिक्षणासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा आवश्यक
अभ्यासक्रम, अभ्यासक्रम पूर्ण करण्याची प्रक्रिया, त्यासाठी योजलेली अध्यापन पद्धती आणि मूल्यमापन किंवा परीक्षा हे कोणत्याही शिक्षण पद्धतीतील महत्वाचे चार स्तंभ आहेत. शिक्षणप्रक्रियेत विद्यार्थी केंद्रबिंदू असून त्याच्या भावनिक आणि बौद्धिक विकासाबरोबर व्यापक अशा समाजाच्या सर्वागीण विकासाची अपेक्षा त्यात गृहित आहे. व्यक्ती आणि पर्यायाने समाजविकास गतिमान राहण्यासाठी कोणत्याही अभ्यासक्रमाची व्यापक उद्दिष्टय़े त्या त्या विद्याशाखांतील अभ्यास मंडळांनी निश्चित केलेली असतात. विद्यापीठ अनुदान आयोग, विद्यापीठे आणि राज्याची शिक्षणमंडळे यांची उच्च शिक्षणाची धोरणे त्यादृष्टीने मार्गदर्शक ठरतात.

व्यक्तिमत्त्व विकास - २८
शिकू या गोगलगायीकडून
बालपणी आपण खूप गोष्टी ऐकतो. आपल्या आई-वडिलांकडून किंवा आजी-आजोबांकडून. उदाहरणेच द्यायची झाली तर ससा आणि कासव यांच्या शर्यतीची, चेरीच्या झाडावर चढणाऱ्या गोगलगायीची. पण त्या गोष्टी ऐकून झोपी जायचे किंवा वर्गात त्या सांगून वाहवा मिळवायची, या व्यतिरिक्त त्यातून बोध क्वचितच घेतला जातो.

सातपूर उपकेंद्रातील वीज पुरवठा खंडितप्रश्नी ग्राहक समितीचा इशारा
नाशिक / प्रतिनिधी
सातपूर उपकेंद्रातील यंत्रसामग्री जुनाट झाल्याने उपकरणे नादुरूस्त होत असून त्यामुळे सातपूर भागातील वीज पुरवठा दररोज कित्येक तास बंद पडत आहे. वीज पुरवठा योग्य दाबाने देण्यासंबंधी उपाययोजना न केल्यास वीज ग्राहक समिती ग्राहक सेवेतील त्रुटी संबंधी नुकसान भरपाईची मागणी ग्राहक न्यायालयात याचिकेव्दारे करेल, असा इशारा वीज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांना देण्यात आला आहे. सातपूर भागातून वीज कंपनीस नाशिक शहराचा ८० टक्के महसूल तथा १८ कोटी रुपये राजस्व दरमहा मिळत असतो. तरीही सातपूर विभागाच्या वीज पुरवठा यंत्रणेची देखभाल, नूतनीकरण, वीज कंपनी करीत नाही व त्यामुळे ग्राहकांना वारंवार वीज पुरवठा खंडित होणे या प्रकारास सामोरे जावे लागते याचा तीव्र निषेध वीज ग्राहक समितीने केला आहे. या तक्रारी संबंधी वीज ग्राहक समितीचे शिष्टमंडळ लवकरच मुख्य अभियंत्यांना भेटणार आहे अशी माहिती अनिल नांदोडे, अ‍ॅड.सिद्धार्थ सोनी, अ‍ॅड. अमोल पाचोरकर, विलास देवळे, सुरेश पाटील, वसंत पांडे यांनी दिली.