Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

साकोली परिसरात ‘एसआरपी’च्या तुकडय़ा दाखल होणार
साकोली, २ एप्रिल / वार्ताहर

भंडारा व गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर नक्षलवाद क्षेत्रातील साकोली

 

परिसरात राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडय़ा दाखल होणार आहेत.
निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांच्या हालचालीवर या तुकडय़ा बारीक लक्ष ठेवणार आहेत.
साकोली तालुका नक्षलवादग्रस्त असल्यामुळे निवडणुकीच्या काळात निवडणूक प्रक्रियेला धोका होऊ नये, यासाठी शासनपातळीवर सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा बलाची व्यवस्था करण्यात येत आहे.
साकोली तालुक्यातील काही गावे अतिसंवेदनशील तर काही संवेदनशील भागात आहेत.
निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकडे पोलीस प्रशासनाची चोख नजर या भागाकडे राहणार आहे.