Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

भगवंतराव विद्यालयाचे बोदलीत समाजसेवा शिबीर
गडचिरोली, २ एप्रिल / वार्ताहर

भगवंतराव अध्यापक विद्यालयाचे समाजसेवा शिबीर बोदली या गावात नुकतेच झाले. या शिबिरात

 

विविध उपक्रम राबवण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आत्माराम जाधव यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, अबुझमाड शिक्षण संस्थेचे सचिव समशेरखां पठाण, अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्य लीना हकीम, बोदलीच्या सरपंच उषा नैताम, गुणवंत निकोडे, विश्वनाथ पेंदाम, रामा निकरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्य आत्माराम जाधव यांनी विद्यार्थ्यांना इच्छाशक्ती, नीतिमूल्ये, बचत, त्याग या विषयावर मार्गदर्शन केले. मदन टापरे यांनी विद्यार्थी जीवनात शारीरिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. समशेरखां पठाण यांनी समाजसेवा शिबिराच्या आयोजनचे महत्त्व पटवून दिले.
प्रास्ताविक प्राचार्य लीना हकीम यांनी केले. संचालन प्रा. पावडे यांनी तर आभार प्रा. ढोले यांनी मानले.