Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

खामगावात ८१ प्रकरणे निकाली
खामगाव, २ एप्रिल / वार्ताहर

येथील विशेष लोकन्यायालयात १४१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८१ प्रकरणे आपसात

 

तडजोड करून निकाली काढण्यात आली. यामध्ये ७६ हजार २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
या लोकन्यायालयाचे उद्घाटन तालुका विधिसेवा समिती अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस.एम. साबू यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी न्या. ए.झेड. तेलगोटे, न्या. एम.आर. नेरलेकर, न्या. एस.बी. शेख, न्या. आर.व्ही. हुद्दार, न्या. डी.एस. थोरात, अ‍ॅड. व्ही.वाय. देशमुख, अ‍ॅड. अनिल व्यास, वकील संघाचे सचिव अ‍ॅड. राजेश गवई, अ‍ॅड. अजय गव्हांदे, कक्ष अधिकारी महालक्ष्मे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना न्या. साबू म्हणाले की, माणसाने माणसासारखे वागले पाहिजे. आपण आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कायद्याचे योग्य पालन केल्यास न्यायालयाची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. या लोकन्यायालयात ४ पॅनल नियुक्त करण्यात आले आहे. पॅनल क्र.१ चे प्रमुख न्या. नेरलेकर, २ चे प्रमुख न्या. थोरात, ३ चे प्रमुख न्या. एस.बी. शेख, ४ चे प्रमुख न्या. आर.व्ही. हुद्दार तर पंच म्हणून अ‍ॅड. व्ही.वाय. देशमुख, अ‍ॅड. डी.व्ही. देशमुख, अ‍ॅड. यशश्री मानेकर, अ‍ॅड. विजयश्री मानेकर, अ‍ॅड. सनी परदेशी, अ‍ॅड. ताकवाले, अ‍ॅड. अनिल व्यास, अ‍ॅड. बडगुजर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक अ‍ॅड. ताकवाले यांनी केले.