Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

मधुकर उपलेंचवार यांना ज्ञानदेवी पुरस्कार
वरोरा, २ एप्रिल / प्रतिनिधी

विद्यार्थी सहाय्यक समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर उपलेंचवार यांची ज्ञानदेवी पुरस्काराकरिता निवड

 

झाली आहे. महाराष्ट्र आचार्य कुलाच्यावतीने मामा क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नागपूर येथे विनोबा विचार केंद्रात आयोजित कार्यक्रमात सोमवार ६ एप्रिलला दुपारी ४ वाजता हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
प्रा. मधुकर उपलेंचवार यांना यापूर्वी मा.बा. गांधी नागपूरचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, लोकमत नागपूरचा त्रिदशकपूर्ती पुरस्कार, महाविदर्भचा प्रेरणा पुरस्कार, रोटरी क्लब चंद्रपूरचा शतक महोत्सवी पुरस्कार, व्यंकटनाथ महाराज शिक्षण संस्था, मूर्तीजापूरचा महात्मा गांधी कार्यगौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. ई टी.व्ही. मराठी या वाहिनीवर ‘संवाद’ या प्रसिद्ध कार्यक्रमात राजू परूळेकर यांनी घेतलेली त्यांची मुलाखत प्रसारित झाली आहे. डॉ. गोविंद कासट यांनी त्यांच्या जीवनावर ‘पणती’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. मधुकर अंबरकर साहित्यिक दिग्रस यांनी त्यांच्या जीवनावर ‘स्पर्श चंदनाचा’ ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली असून राजश्री प्रकाशन पुणे यांनी ती प्रकाशित केली आहे.