Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर रविवारपासून
खामगाव, २ एप्रिल/ वार्ताहर

दरवर्षीप्रमाणे मुला- मुलींना उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून घेण्याकरिता दि नॅशनल

 

एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित नॅशनल हायस्कूलमध्ये सातवे अनिवासी क्रीडा व व्यक्तिमत्त्व विकास शिबीर ५ एप्रिलपासून आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर १४ एप्रिलपर्यंत चालेल. सहभागी शिबिरार्थ्यांना शिबिराच्या वतीने टी शर्ट, प्रमाणपत्र, तसेच क्रीडा प्रकारातून उत्कृष्ट खेळणाऱ्या दोन खेळाडूंना प्रथम व द्वितीय पुरस्कार देण्यात येईल, सवरेत्कृष्ट शिबिरार्थीला प्रत्येकी एक पुरस्कार व इतर प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येईल. शिबिराची वेळ रोज सकाळी ७ ते १० पर्यंत राहील.
या शिबिरामध्ये प्रत्येक क्रीडा प्रकार व इतर कार्यक्रमाकरिता अनुभवी व तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष तसेच खेळाचा भरपूर सराव मिळणार आहे. तरी जास्तीत जास्त शिशू, मंदिर, प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच इच्छुकांनी या सुवर्ण संधीचा लाभ स्वत: घेऊन या शिबिराविषयी इतरांनाही माहिती द्यावी, असे नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव चेतन लोडाया, प्राचार्य बी.आर. हुरसाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.