Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वन्यजीवांची तहान-भूक भागवा; ‘पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स’चे आवाहन
वर्धा, २ एप्रिल / प्रतिनिधी

मन आणि बुध्दी बाळगून असणाऱ्या मनुष्याने रखरखत्या उन्हात पाण्याची ओरड केल्यास तत्परतेने

 

सगळे धावतील. रस्त्यावरच्या वाटसरूंसाठी पाणपोई लागेल. टँकर धावेल. मात्र पशुपक्ष्यांचे काय? तहानलेल्या वाघाची डरकाळी किंवा चिमणीची चिवचिव ऐकून क ोणी वाटीभर पाणी पुढे करणार काय?
अशाच प्राणीमात्रांची या उन्हाळ्यातील तहान पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर अधिकच तीव्र ठरत आहे. नदी, नाले, पाणवठे ओस पडल्याने हे मुके जीव जातील कुठे? या प्रष्टद्धr(२२४)्नााच्या उत्तरासाठी वन्यजीवप्रेमींनी सर्वसामान्यांना मदतीची साकडे घातले आहे.
‘पीपल्स फ ॉर अ‍ॅनिमल्स’ या संघटनेने मुक्या जिवांची तहान - भूक भागवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाढता उष्मा अनेकांचा जीव घायकुतीस आणू लागला आहे. पर्यावरणाचे विविध घटक, प्राणी, पक्षीसुध्दा या कडक उन्हाने व्याकुळ आहेत. त्यांची तहान भागवण्यासाठी घराच्या आसपास, गच्चीवर, खिडक्यांमधे पाण्याने भरलेली छोटी भांडी ठेवण्याचे आवाहन या संघटनेने केले आहे.
वन्य प्राण्यांची भूक भागवण्यासाठी अशाच जागेवर पोळयाचे तुकडे, तांदूळ, डाळ, गहू पसरून ठेवावे. मैना, चिमणी, पोपट व अशाच पक्ष्यांसाठी घर ‘अन्नछत्र व पाणपोई’ ठरू शकेल. त्यांची वणवण थांबेल. जंगलकाठच्या गावकऱ्यांनी जंगलातच कृत्रिम ‘पाणवठा तयार क रून पाण्याची सोय करावी. पाण्याच्या शोधात भटकणाऱ्या प्राण्यांची त्यामुळे मोठी सोय होईल, अशी आशा संघटनेचे सचिव आशीष गोस्वामी यांनी बाळगली आहे. पक्षी अति उष्मेने भोवळ येऊन पडतात. त्यांना थोडे पाणी देऊन शांत केले जाऊ शकते. मात्र पक्ष्याला खूप हाताळू नये. त्यामुळे केवळ भीतीपोटी पक्षी दगावतो, असेही निदर्शनास आणण्यात आले आहे. या उन्हात कुठल्याही पक्षी-प्राण्यास दुखापत झाल्यास संघटनेच्या वतीने नि:शुल्क सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गरज पडल्यास ९४२२१४१२६२ या क्रमांकावर संपर्क करण्याची सूचना आहे.