Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

रोजगार हमी कायदेविषयक शिबीर
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर

राष्ट्रीय रोजगार हमी कायदा २००५ मध्ये विहित असलेल्या अधिकाराबाबतची माहिती देण्याकरिता

 

नागझरी येथे कायदेविषयक प्रबोधन शिबीर नुकतेच झाले.
तालुका विधि-सेवा समिती व वकील संघाच्यावतीने झालेल्या या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. सोईतकर पोलीस उपनिरीक्षक जगदळे, पंचायत समितीचे अधीक्षक चौधरी उपस्थित होते. या शिबिराचे उद्घाटन तालुका विधि- सेवा समितीचे अध्यक्ष दिवाणी न्यायाधीश योगेशकुमार रहांगडाले यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविक चौधरी यांनी केले. रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना मिळणारे काम, स्वरूप, मजुरीचे दर नोंदी इत्यादीं बाबतची माहिती त्यांनी दिली. अ‍ॅड. सोईतकर यांनी रोजगार कायद्यांतर्गत नोंदणी करून कार्ड प्राप्त करणे, कामाची मजुरी, काम उपलब्ध नसेल तर मिळणाऱ्या भत्त्याचे स्वरूप इत्यादीं विषयी बहुमुल्य माहिती दिली.
अ‍ॅड. एस.आर. अली यांनी कायदेविषयक तरतुदी, कामाविषयी तक्रार, मजुरांचे अपंगत्व, नुकसान भरपाई यावर प्रकाश टाकला.
योगेशकुमार रहांगडाले यांनी शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सखोल माहिती देऊन अंतर्गत तरतुदींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक भार्गव यांनी केले. तर अ‍ॅड. सिंग यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास तालुका विधि सेवा समिती सचिव व गटविकास अधिकारी संजय राऊत, अ‍ॅड. ए.जी. तिवारी, अ‍ॅड. नरेंद्र पैकीने, अ‍ॅड. लांजेवार, अ‍ॅड. शैलेश मिश्रा, अ‍ॅड. मनोज सुखिजा उपस्थित होते.