Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संदीप रायपुरे यांना पुरस्कार
चंद्रपूर, २ एप्रिल / प्रतिनिधी
शांततेकडून समृद्धीकडे हे ब्रिद असलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पुरस्कार जाहीर

 

झाल्यानंतर सहा महिन्यानंतर पुरस्कारप्राप्त पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात आले. गोंडपिपरीचे पत्रकार संदीप रायपुरे यांना नुकताच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रायपुरे यांनी तंटामुक्त गाव मोहिमेवर सातत्याने प्रबोधनात्मक व जनजागृतीवर वृत्त लिहिले व जनजागृती केली. गोंडपिपरी पोलीस ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमात ठाणेदार एस.डी. जाधव यांच्या हस्ते पत्रकार संदीप रायपुरे यांना जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार व २५ हजार रुपयांचा धनादेश प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मनोहर एकोणकार, राजेश चुंचूवार, धम्मकीर्ती दुर्गे, जयवंत देठे उपस्थित होते. संदीप रायपुरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
तुकूम परिसरात पाणपोई
युवाक्रांती सोशल फोरमच्यावतीने स्थानिक तुकूम परिसरातील डॉ. अच्युत यांच्या दवाखान्याजवळ चंद्रभान ससनकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी परंपरागत कार्यक्रमाला फाटा देत पाणपोईची स्थापना करण्यात आली. या पाणपोईचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक रघुनाथ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.