Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची आमसभा
भंडारा, २ एप्रिल / वार्ताहर
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या जिल्हा शाखेची वार्षिक आमसभा जिल्हाध्यक्ष वसंत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मध्यवर्ती संघटनेचे

 

उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, सहचिटणीस लीलाधर पाथोटे व निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद चरडे उपस्थित होते. वसंत लाखे यांनी याप्रसंगी कर्मचारी संघटनेने लढय़ाची तयारी ठेवावी, असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा शाखेची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. अध्यक्ष-रामकृष्ण कुथीरकर, कार्याध्यक्ष-नरेश कुंभलकर, उपाध्यक्ष- अशोक निमकर, उपाध्यक्ष- यशवंत पारधी, उपाध्यक्ष- रामचंद्र तरोणे, उपाध्यक्ष (महिला)- आशालता बर्वे, सरचिटणीस- वसंत लाखे, सहचिटणीस- जाधव साठवणे, सहचिटणीस- सिद्धार्थ मेश्राम, कोषाध्यक्ष- एस.बी. भोयर, सहकोषाध्यक्ष- रामलाल हरडे, संघटक- रवींद्र मानापुरे, संघटक- युवराज गिऱ्हेपुंजे, महिला प्रतिनिधी- सेवंता वघारे, तालुका प्रतिनिधी-लाखांदूर- रमेश गजापुरे, साकोली- राकेश विटणकर, लाखनी- सुरेंद्र बन्सोड, भंडारा- गजानन लोणारे, मोहाडी- रघुनाथ खराबे, तुमसर- भोजराज देशमुख यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. या सभेचे संचालन अशोक निमकर यांनी केले.