Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

ही माझी शेवटची निवडणूक -दत्ता मेघे
पुलगाव, २ एप्रिल / वार्ताहर

ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनोत्कट आवाहन वर्धा लोकसभा मतदारसंघातील

 

काँग्रेसचे उमेदवार दत्ता मेघे यांनी केले आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत जनतेची सेवा करण्याचा धर्म पाळण्याचे आश्वासन दिले.
आतापर्यंत मी गोरगरिबांची सेवा केली. आता यापुढे ती करीन कारण, तळागाळातील जनतेची सेवा करणे हाच माझा धर्म मी मानतो व जनतेलाही याची जाण आहे. धर्म मी आयुष्याच्या शेवटापर्यंत पाळीन, असे दत्ता मेघे म्हणाले.
गुरुनानक मंगल कार्यालयात निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांच्या सभेत त्यांनी केला. प्रास्ताविक नगर काँग्रेस समितीचे अध्यक्ष रमेश सावरकर यांनी केले. या सभेत आमदार रणजित कांबळे यांनी भाजप-सेनेचे उमेदवार सुरेश वाघमारे यांचा खरपूस समाचार घेतला. चारुलता टोकस, प्रमोद दरणे, जिल्हा अध्यक्ष प्रा. किरण उरकांदे, देवळीचे पंचायत समिती सभापती मनोज वासू यावेळी उपस्थित होते. सभेचे संचालन प्रा. अश्विन शहा यांनी केले. या कार्यक्रमानंतर इंदिरा चौकात निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मेघे यांच्या हस्ते झाले.