Leading International Marathi News Daily
शुक्रवार, ३ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

संघटित प्रयत्नातूनच विजय शक्य -मुकुल वासनिक
कुही, २ एप्रिल / वार्ताहर

ज्येष्ठांचे आशीर्वाद, तरुणांचे सहकार्य व कार्यकर्त्यांच्या संघटित प्रयत्नामुळेच येत्या लोकसभा

 

निवडणुकीत रामटेकचा गढ जिंकणार असल्याचा आशावाद काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार मुकुल वासनिक यांनी येथील सभेत व्यक्त केला.
या सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार देवराव रडके होते. यावेळी माजी मंत्री श्रावण पराते, आमदार राजेंद्र मुळक, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुनीता गावंडे, सुरेश बोराडे, वसंत इटकेलवार, रतनलाल बरबटे, हुकूमचंद आमदरे, गंगाधर रेवतकर, पंजाबराव देशमुख, सुरेश कुमरे, मधुसूदन नायडू, पद्माकर कडू, गंगाधर देशमुख, नागोराव जिभकाटे आदी उपस्थित होते. कुही तालुका काँग्रेसाध्यक्ष गंगाधर देशमुख यांनी प्रास्ताविक केले. नागोराव जिभकाटे यांनी कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले. आमदार राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली. आपल्याला चांगला उमेदवार लाभला आहे. त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून प्रयत्न करावे, असे त्यांनी आवाहन केले. गोरगरिबांचा खऱ्या अर्थाने विकास काँग्रेसनेच केला. सामाजिक दोष दूर करून देशाला एकसंघ ठेवण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी पार पाडली असून पक्षाचे राजकारण सत्तेसाठी नाही तर विकासासाठी आहे, असा दावा वासनिकांनी यावेळी केला.
मुकुल वासनिकांच्या या पहिल्याच दौऱ्यात कार्यकर्त्यांची भरगच्च उपस्थिती व उत्साह दिसून आला. याप्रसंगी अरुण हटवार, विलास देशमुख, अफझलखाँ पठाण, राजू येळणे, सुरेश येळणे, सूर्यभान तिजारे, मुन्ना भालोटिया, महादेवराव जिभकाटे, विनोद हरडे, डॉ. केवलराम तितरमारे, उपस्थित होते. संचालन सूर्यमणी वासनिक यांनी केले तर आभार गंगाधर देशमुख यांनी मानले.