Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

नवा गडी, नवा राज!
बुलढाणा

सोमनाथ सावळे

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या वेळची निवडणूक अतिशय उत्कंठेची ठरणार आहे. निवडणूक रिंगणात १५ उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना-भाजप युतीचे प्रतापराव जाधव व राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यातच होणार आहे. सध्या ही लढत ‘बरोबरी’ची दिसत असून विजय आणि पराभवाच्या गणितात बसपाचे वसंतराव दांडगे व भारिप बमसंचे रवींद्र ढोकणे यांच्या मतांची आघाडी निर्णायक राहणार आहे.

काँग्रेससाठी अस्तित्वाचा लढा
अकोला

क्रांतिकुमार ओढे

मतदाराने वारंवार नाकारल्यामुळे अकोल्यात काँग्रेससाठी यावेळी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला रिंगणात उतरवून काँग्रेसने यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार संजय धोत्रे यांना जोरदार आव्हान दिले आहे, तर या दोन तुल्यबळ मराठा नेत्यांच्या संघर्षांत भारिप-बमसंचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मतविभाजनाचा लाभ मिळण्याचे संकेत आहेत.

लालगड धोक्यात
राजेंद्र चोपडे

ऐ तिहासिक भारत-अमेरिका अणुकरारावर काँग्रेसला खिंडीत पकडणाऱ्या डाव्यांचा पश्चिम बंगालमधील बालेकिल्ला ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेसच्या दणक्यासमोर तर केरळमधील बालेकिल्ला आघाडीतील मतभेद, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातील बंडखोरीने ढासळण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट व मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला आलटून-पालटून राज्याची सत्ता देण्याची पंरपरा असलेल्या केरळमध्ये १६ एप्रिलला सर्वच्या सर्व म्हणजे २० लोकसभा मतदारसंघात मतदान होत असून त्यासाठी सुमारे २०० उमेदवार रिंगणात आहेत.

म्यानातच राहते
तलवारीची पात

हा घ्या शिरा.
वा!आज अगदी न मागता. काही मागायचं आहे वाटतं.
काही मागणार नाही तुमच्याकडे. शिरा खास तुमच्यासाठी केलाय! तुम्ही नाही सांगितलं तरी आम्हाला कळलं?
काय?
तुमची दिल्लीला बदली होणारय म्हणे. सगळ्या बिल्डिंगमध्ये कळलंय.
तुही त्या नांदेडकराला सामील झालीस वाटतं.
कोण ह्य़ो नांदेडकर? मला काहीच माहित नाही.
आमचा हेडक्लार्क गं! त्यानंच आमच्या बॉसला सांगितलं होतं, मला दिल्लीला पाठवा म्हणून. लई डांबीस हाये तो.
उलट चांगलंच झालं असतं की.
तुला आमच्या कंपनीतलं राजकारणं माहित आहे का?
नाही बाई.

राजस्थानमध्ये बसपाला जबर धक्का, सहाही आमदार काँग्रेसमध्ये दाखल
नवी दिल्ली, ४ एप्रिल/खास प्रतिनिधी

अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारने आज मीणा समाजाचे नेते किरोडीलाल मीणा यांच्या नाराजीमुळे निर्माण होणारे राजकीय संकटाचे ढग केवळ पांगविलेच नाही तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मायावतींच्या बसपाला मोठा धक्काही दिला. राजस्थान विधानसभेवर निवडून आलेले बसपाचे सहाही आमदार आज दुपारी काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यामुळे अल्पमतात असलेल्या काँग्रेसला आता २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत १०२ सदस्यांसह पूर्ण बहुमत लाभले आहे.