Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

वरून कीर्तन, आतून तमाशा..
ठिकाणावर तर पोहोचलो,
पुढे काय?
म्हणजे मी असं विचारतो, ‘येथे आलो आता वर थांबणार की आत जातांय?’
कसंही, आपल्याला काय आरामच करायचायं. वर काय न् आत काय? कुठही घटकाभर टेकलो

 

म्हणजे झालं..
तुमच्या लक्षात कसं येत नाही? वर आणि आत फरक आहे. वर वेगळं आहे, आत निराळंच आहे.
कोडय़ात कशाला बोलता? काय ते क्लिअर तर करा ना राव!
अहो, क्लिअर कशाला करायला हवं? आवाजावरून कळत नाही का? वरच्या बाजूला टाळ, मृदंगाची किणकिण सुरू आहे.
मग?
मग काय विचारता? वरच्या बाजूला चाललेली मृदुंग, टाळांची किण किण ऐकू येते, आतल्या बाजूचे चाळ आणि ढोलकी नाही ऐकू येत?
च्या मारी, खरंच की! वर कीर्तन अन् आतमध्ये मराठी ‘लोककले’चं प्रदर्शन दिसतंय!
तेच तर काल आबांनी सांगितलं..
म्हणजे?
अहो, असं काय करताय, हत्तीवर काय फक्त राजे,महाराजेच बसतात असं नाही. कीर्तनकारही बसतात, आणि..!
आणि कोण?
नाही, म्हणजे ‘हत्ती’वर हभपही बसतात आणि ‘खासदार’ही बसतात. शिवाय हा काही अंबारीवाला हत्ती नाही. बिगर अंबारीच्या ‘हत्ती’वर उन्हाचे चटकेच जास्त बसतात.
बसू देत की, आपल्याला काय करायचं? आणि हत्तीवर कोणी बसावं याचा काही नियम थोडाच आहे?
तसं नाही. पण आबांचा आक्षेप नक्की कशाला आहे हे नाही समजलं. ‘हत्ती’वर बसण त्यांना पटलं नाही की, ‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा’ला विरोध आहे, कोण जाणे?
आबांचा आक्षेप दोन्हीला असू शकतो. कारण ‘हत्ती’चा त्रास घडय़ाळाच होणार आणि तमाशासारख्या रात्र-रात्र जागवणाऱ्या गोष्टींना विरोध आबांनी नाही, तर कोणी करायचा?
तरीही एका गोष्टीचा उलगडा होत नाही. ‘हत्ती’वर बसणारे कीर्तन करतात हे माहिती होतं. त्यांनी तमाशा कधी केला? ते कधी कनातीत सापडल्याचेही आमच्या ऐकण्यात नाही!
मग गेली पाच वर्षे काय सुरू होतं..?
चतुर