Leading International Marathi News Daily
रविवार , ५ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नगरमध्ये २३, तर शिर्डीमध्ये ३५ उमेदवारांचे अर्ज
नगर, ४ एप्रिल/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी नगर मतदारसंघात २३ उमेदवारांनी ४२ अर्ज, तर शिर्डी मतदारसंघात ३५ उमेदवारांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपचे दिलीप गांधी, बसपतर्फे तुकाराम गडाख, काँग्रेस-रिपब्लिकन आघाडीतर्फे

 

खासदार रामदास आठवले, काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रूपवते आदींचा समावेश आहे.
भाजपचे गांधी यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत दुपारी २ वाजता अर्ज दाखल केला. मिरवणुकीने आलेल्या गांधी यांच्यासमवेत आमदार सर्वश्री. अनिल राठोड, विजय औटी, चंद्रशेखर कदम व सदाशिव लोखंडे, जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे, भटक्या विमुक्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी शेलार, अभय आगरकर, सुनील रामदासी, भगवान फुलसौंदर, वसंत लोढा, नरेंद्र कुलकर्णी, कालिंदी केसकर, सुरेखा विद्ये आदी होते.
नंतर पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले की, लोकांना मी हवा असून, केंद्रात मंत्री असताना मोठय़ा प्रमाणावर विकासकामे केल्याने त्याचा फायदा मला होईल. शिवाय मतदारसंघात भाजप व सेनेचे प्रत्येकी २ आमदार आहेत.
सकाळी सर्वात अगोदर खासदार रामदास आठवले यांनी शिर्डीतून अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत खासदार बाळासाहेब विखे, पालकमंत्री दिलीप वळसे, राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर, आमदार कन्हैयालाल गिडवानी व जयंत ससाणे, दादा कळमकर, काँग्रेस-राष्ट्रवादी व रिपाईंचे नेते होते. नंतर आठवले यांचा ओम गार्डन येथे मेळावा झाला.
बसपतर्फे खासदार तुकाराम गडाख यांनी दुपारी अडीच वाजता अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत बसपचे जिल्हाध्यक्ष अनिल ओहोळ, तानाजी कांबळे आदी होते. नंतर पत्रकारांशी बोलताना गडाख यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस बंडखोर प्रेमानंद रूपवते यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. काँग्रेसने दलित नेतृत्वाची उपेक्षा केली, अशी टीका त्यांनी केली.
याशिवाय नगर मतदारसंघातून कृष्णाजी राजे, राजेंद्र काळे, सुरेश बर्फे यांनी अपक्ष; तर शिर्डीतून भरत निकाळजे, सुचित धोत्रे, सुनील क्षेत्रे आदींनी अर्ज दाखल केले.