Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

भालुकपाँगचा गणेशबाबा
सकाळी लवकर आवरून गुवाहाटीहून तेजपूरला निघालो होतो. ईशान्य भारताला आता पूर्वाचल म्हणून आपण ओळखतो. साधारण तीस वर्षांपूर्वी मणिपूर व त्रिपुरा वगळता हा सारा भाग आसाम म्हणूनच ओळखला जात असे. आता त्यातून छोटी छोटी सात राज्ये निर्माण झाली आहेत. ‘डोंगरदऱ्यांचा, वळणावळणांचा रस्ता असल्याने गुवाहाटी ते तेजपूर या १८० किलोमीटरच्या प्रवासाला १०-१२ तास लागले. डोळ्यांना सुखविणाऱ्या हिरव्या रंगाच्या विविध छटा चारही बाजूंनी सोबत करीत होत्या.

लोकसत्ता कॅम्पेन
संवेदनशील माणसांची राजकारणाबाबत असणारी उदासीनताच बुडत्याचा पाय अधिक खोलात जाण्यास कारणीभूत ठरते. अतुल कुलकर्णी यांनी पंधरा दिवसांपूर्वी वृत्तान्तमधून नेमक्या याच भावनांना वाट मोकळी करून दिली आणि अनेक वाचकांनी त्यास दुजोरा दिला. निवडणुका म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था अधिक भक्कम करणारी प्रक्रिया. ती अधिक पारदर्शी आणि मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी सामान्य नागरिकांच्या मनात असलेल्या विचारांना या लेखाने वाट मोकळी करून दिली. एरवी राजकारण म्हटले की सोयीस्कर दुर्लक्ष करणाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. प्रत्यक्ष राजकारणात सहभागी होण्याइतकेच एक जागृत मतदार म्हणून आपला अधिकार नीटपणे बजाविणे लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचा निर्वाळा या प्रतिक्रियांमधून व्यक्त झाला आहे..

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता कुठे सुरू झाली आहे. प्रचाराचा धडाका अद्याप सुरू व्हायचा असला तरी राजकीय पक्षांचे दावे-प्रतिदावे आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. या उमेदवारांमध्ये राजकीय क्षेत्रांत आधीपासून कार्यरत असलेल्या व्यक्तींबरोबरच आपल्या पक्षाची लोकप्रियता टिकून राहावी, आपल्या पक्षाच्या अधिकाधिक उमेदवारांना विजय प्राप्त व्हावा म्हणून फार पूर्वीपासूनच सिनेमासृष्टीतील आघाडीच्या कलावंतांची लोकप्रियता आपापल्या पक्षाच्या विजयासाठी ‘कॅश’ करण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला आहे.

‘तुला मी, मला मी’
उत्खनन : सृजन-व्यभिचाराचं!

प्रख्यात कन्नड नाटककार गिरीश कर्नाड यांनी अलीकडेच लिहिलेलं ‘ब्रोकन इमेजेस’ हे नाटक ‘तुला मी, मला मी’ या नावानं नुकतंच मराठी रंगभूमीवर आलेलं आहे. विवेक लागू यांनी त्याचं रूपांतर व दिग्दर्शन केलेलं आहे, तर अभिनेत्री रीमा यांनी ते आविष्कारीत केलं आहे. (यापूर्वी बंगलोरच्या ‘रंगशंकरा’ संस्थेतर्फे अरुंधती नाग यांनी ‘बिखरें बिंब’ या नावानं ते हिंदीत केलं होतं.) कर्नाडांची नाटकं ही मिथककथा वा लोककथांवरच प्रामुख्यानं आधारलेली असतात, असा आजवरचा समज! अर्थात तो गैरही नव्हता.

अँग्री प्रौढ मॅन!
‘गर्व आहे मी महाराष्ट्रीय असल्याचा’ या विधानात केवळ मराठी माणसाला गृहीत धरलेले नाही. मराठी माणसाच्या अधोगतीसाठी परप्रांतीय माणसे जबाबदार नाहीत, असे शिवाजी महाराज आपल्या पहिल्याच भाषणात क्लिअर करतात. चित्रपटाची क्षणचित्रे पाहून, हे शिवाजी महाराज प्रांतवादी आहेत की काय, असा झालेला समज हा गैरसमज ठरतो. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’मधील दिनकर भोसलेचा संघर्ष हा मराठी माणसाचा नसून सामान्य माणसाचा आहे. अमिताभची प्रतिमा ज्या काळात अँग्री यंग मॅन म्हणून झाली. त्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत आपणही संघर्ष करू शकतो ही उमेद अमिताभने प्रेक्षकांमध्ये निर्माण केली. त्यामुळे अमिताभच्या भूमिकांची नाळ प्रेक्षकांशी आपोआपच जोडली गेली.

फणसाड अभयारण्यातील पुष्पोत्सव
मुंबईपासून सुमरे दीडशे कि. मी.असलेले रायगड जिल्ह्य़ातील फणसाड अभयारण्य अलीकडे वन्यजीवप्रेमींचे आकर्षण ठरू लागले आहे ते तिथे असणारी गिधाडे, शेकरू खार, इतर बरेच पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी इत्यादीमुळे. मात्र महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सबंध भारतातील इतरही अभयारण्यांप्रमाणेच फणसाडमधील वन्यजीव प्रकार व संख्येत वर्षांनुवर्षे घटच होत आहे. वन्यजीवांना अभय मिळावे म्हणून वनांना
अभयारण्यांचा दर्जा दिला जातो.

यू गेट द किंग यू डिझव्र्ह.. या आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. राजकारणापासून सामान्य समाज अलिप्त राहायला लागल्यापासून आपला प्रवास त्या क्षेत्रात अधोगतीच्याच दिशेने सुरू झाल्यासारखी स्थिती आहे.. निवडून कुणीही आले तरी आपल्याला काय फरक पडतो, ही मानसिकताच त्याच्या मुळाशी आहे. आता या मानसिकतेला छेद द्यायला हवा. नेमकी तीच भूमिका प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मांडली आहे. केवळ राजकारणसाक्षर नव्हे तरी राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ व्हायला हवे, असे सांगताना त्यांनी ‘मतदानामध्ये ‘वरीलपैकी कुणीही नाही’ हा पर्याय तर राजकीयदृष्टय़ा आत्महत्याच असेही म्हटले आहे. अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाविषयी आपल्याला काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला २२८४६२७७/ २२८२२१८७ वर फॅक्सने पाठवू शकता किंवा vruttant@gmail.com या ई मेलवर नोंदवू शकता.

बच्चे कंपनीसाठी साहस शिबीर
प्रतिनिधी :
द नेचर लव्हर्स ही संस्था गेले अनेक वर्षे विविध शिबिरांचे आणि मोहिमांचे आयोजन करीत आली आहे. टीव्ही आणि संगणक विश्वात अडकलेल्या लहान मुलांना निसर्गाची ओळख झाली पाहिजे. यंदाही २२ ते २६ एप्रिल या कालावधीत संस्थेने ‘निसर्ग साहस शिबीर - महाबळेश्वर २००९’चे आयोजन केले आहे. या साहस शिबिरात आठ ते १६ वयोगटातील मुलांना सहभागी होता येईल. या शिबिरात महाबळेश्वर जवळील प्रतापगडाच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, राफ्टींग, कमांडो ब्रिज, ट्रेझरहंट, गड दर्शन, पक्षी निरीक्षण, आकाशदर्शन, निसर्ग भ्रमंती आदींचा समावेश असून याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : नंदा लस्ते (मो. क्र. ९८९२६०८४११), कक्षा खांडेकर (९८६९५३०१३१), भारत नारायणकर (९८६९०४६६११).

लहान मुलांसाठी वैज्ञानिक कार्यक्रम
प्रतिनिधी :
मुलांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन मराठी विज्ञान परिषदेने उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणजे १५ ते २४ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बालोद्यान’ हा दोन दिवसांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात मुलांना वैज्ञानिक गोष्टी ऐकयला मिळणार आहेत. त्यातील सत्यता मुलांना पटावी यासाठी त्यांना विविध प्रयोग करण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. त्याचबरोबर मातीची वैज्ञानिक खेळणी बनविणे, चित्र रेखाटणे आदी विविध उपक्रमांचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. इयत्ता दुसरी ते पाचवी आणि सहावी ते नववी अशा दोन गटांतील विद्यार्थ्यांसाठी ‘परिसरातील साहित्यातून विज्ञान खेळणी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्टय़ म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात येते. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान मित्र’ हा सहा दिवसांचा अभ्यासक्रम होणार आहे. या अभ्यासक्रमात कोणीही शिक्षक नसतो, केवळ मार्गदर्शक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. यात विविध वैज्ञानिक पुस्तके वाचणे, त्यावर चर्चा करणे, विविध प्रयोग-प्रकल्प तयार करणे, भटकंती, आरोग्य, परिसर, नैसर्गिक साधनसामग्री आदी विषय हाताळले जातात. या गटातील विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेतील उपकरणांच्या आधारे प्रयोग करता यावा यासाठी तीन तासांचा ‘विज्ञान प्रयोगाचा कार्यक्रम’ हा उपक्रम २४ एप्रिल रोजी होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, दू. क्र. २४०५४७१४ किंवा २४०५७२६८.

बाल कलाकारांच्या रंगकामाचे प्रदर्शन
प्रतिनिधी :
चित्रांकन आर्टस् या संस्थेतर्फे १० ते १२ एप्रिल या कालावधीत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या कला दालनात (रवींद्र नाटय़ मंदिर) बाल कलाकारांच्या रंगकामाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन १० एप्रिल रोजी दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.त्यानंतर १२ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना हे प्रदर्शन पाहता येईल.

चित्रकारांचा ग्रुप शो ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवात
भर टाकणाऱ्या महापालिकेच्या कापूरबावडी येथील कलादालनात येत्या ७ ते १५ एप्रिल दरम्यान शहर परिसरातील १६ नामांकित चित्रकरांच्या कलाकृतींचे प्रदर्शन पहायला मिळणार आहे. मंगळवार ७ एप्रिल रोजी दुपारी साडेचार वाजता महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे होणार असून मुंबईतील नेहरू सेंटरच्या सहाय्यक संचालिका नीना रेगे, पत्रकार नरेंद्र कामत आणि ज्येष्ठ कलावंत शांताराम राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रदर्शनात कैलास अन्याल, विजयराज बोधनकर, श्रृती, श्रीकांत कशेळकर, प्रकाश खारकर, जयंत कोळेकर, सुशांत कुवसेकर, आनंद महाजनी, किशोर नानवडेकर, मनोहर निकम, उदय पळसुलेदेसाई, शैलेश साळवी, भुषण सावर्डेकर, सुभाष शेगोकर, शरद तावडे आणि डॅनियल तळेगांवकर या चित्रकरांच्या कलाकृती पहायला मिळणार आहेत.
प्रतिनिधी