Leading International Marathi News Daily

रविवार , ५ एप्रिल २००९

गोविंद नारायण जोशी (१९०९-१९९४) हे मूळचे विदर्भातले, खामगावचे. यंदा त्यांची जन्मशताब्दी. त्यानिमित्तानं त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेणं समयोचित ठरावं. जी. एन. जोशी म्हणूनच ते ओळखले जात. पुणे व नागपूर इथं शिकून बी.ए. आणि एल.एल.बी. होऊन ते मुंबईस आले. वकिली सोडून संगीताच्या क्षेत्रात रमले. शिकत असतानाच नाटकांतून कामं करण्याची मोठीच हौस त्यांना होती! गाण्याची आवड व तालीम लहानपणापासूनच मिळालेली होती. विदर्भातल्याच मेहेकर येथील ना. घ. देशपांडे यांनी सप्टेंबर १९२९ मध्ये ‘शीळ’ ही कविता लिहिली. पारंपरिक चालीमध्ये जी. एन. जोशी आपल्या जलशात, गाण्याच्या कार्यक्रमात ती म्हणत असत. रेडिओवरही गात असत. एका बैठकीत ग्रामोफोन कंपनीच्या रमाकांत रूपजी यांनी हे काव्यगायन ऐकलं व ध्वनिमुद्रणासाठी आमंत्रण दिलं. दोन गाणी मुद्रित करायची असं ठरलं होतं. दुपारी चार वाजता सुरू झालेलं ध्वनिमुद्रण पहाटे चारला संपलं व आठ गाणी झाली.

बलवंत संगीत मंडळीतील प्रमुख स्त्रीपार्टी नट गणपतराव मोहिते यांचे शुक्रवारी पहाटे सांगली मुक्कामी निधन झाले. नुकतीच, १ जानेवारी २००९ रोजी गणपतरावांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती. गणपतरावांना उत्तम आरोग्य लाभले होते. वयाच्या शंभरीतही ते उत्साही होते. संगीत-नाटय़विषयक कुणी काही विचारले तर प्रेमाने सांगत होते. असा हा कलाक्षेत्रातला एका शतकाचा साक्षेपी साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. गणपतरावांचे पूर्ण नाव गणेश लक्ष्मण मोहिते. जन्म १ जानेवारी १९०९ रोजी मिरज येथे. गणपतरावांचे शालेय शिक्षण मिरज येथेच इयत्ता पहिलीपर्यंत झाले. वडील लक्ष्मणरावांना संगीताची आवड होती. संगीताचे भीष्माचार्य बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांकडे ते थोडीफार गायकी शिकले होते. गणपतरावांना २ भाऊ आणि ५ बहिणी. मोठा बळवंत हा बळवंतराव मराठे यांच्या ‘हिंदी नाटक मंडळीत’ बालनट होता. मधला शंकर हा जनुभाऊ निमकरांच्या ‘स्वदेश हितचिंतक मंडळीत होता. पुढे लक्ष्मणरावांनी शंकर आणि गणूला संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या ‘ललितकलादर्श’मध्ये दाखल केले. ललितकलादर्शच्या ‘शापसंभ्रम’ मध्ये गणूने महाश्वेताच्या मैत्रिणीचे काम केले.

सोमवारी मध्यरात्री माझा फोन वाजला आणि बंद झाला. स्टार न्यूजचे व्यवस्थापकीय संपादक मिलिंद खांडेकर यांनी एवढय़ा रात्री फोन का केला असेल, याचा मी विचारच करत होते. कारण स्टार न्यूज सोडून वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला होता. असेल एखादी Breaking News आणि फोन एका चपळगावकराऐवजी दुसऱ्यालाही केला असेल असा विचार करून सवयीनुसार टी. व्ही. लावला, पण काहीच नव्हतं. तेवढय़ात पुन्हा फोन वाजला. फोनवर ‘स्टार माझा’चे राजीव खांडेकर होते. म्हणाले, ‘भक्ती, एक वाईट बातमी आहे. व्यंकटेश एका बातमीसाठी सोलापूरला जात होता, त्याच्या गाडीला अ‍ॅक्सिडेंट झालाय. तो त्यात गेला.’ मी बधीर झाले. व्यंकटेशचा मृत्यू.. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न स्वत:लाच विचारत होते. त्याच वेळी राजीव म्हणाले, ‘त्याच्या घरच्यांना अपघाताबद्दल माहिती आहे, पण तो गेलाय हे माहीत नाहीये, त्यांना, विशेषत: त्याच्या बायकोला, हे कसं सांगायचं?’ मी म्हटलं, मी इतरांशी बोलते, पण रूपाशी बोलायची माझी हिम्मत नाही. ते मी प्रतिभा चंद्रन (सहाराची पुणे प्रतिनिधी) ला सांगते. मी प्रतिभाला फोन लावला. तर ती रडत होती, म्हणाली, ‘‘भक्ती, क I am with him. I am the First one to see him dead.'' त्यानंतरची रात्र फक्त फोन कॉल्समध्ये गेली. नातेवाईक, पत्रकार मित्र एकमेकांना फोन करत होते. बातमीवर विश्वास ठेवायला कोणीच तयार नव्हतं.

राजा डेव्हिड याने आजूबाजूच्या प्रदेशातील शत्रूंचा पूर्णपणे बीमोड केला आणि इस्राएली लोकांचे एक विशाल संघराज्य बनविले. त्याने जेरूसलेमला आपली राजधानी स्थापन केली आणि भव्य राजवाडा बांधला. त्याला देवासाठी महान मंदिर उभारायचे होते, परंतु देवाने त्याला संदेश देऊन मंदिर न बांधण्याचा आदेश दिला. कारण राजाच्या हातून व्यभिचाराचे आणि सदोष मनुष्यवधाचे पाप झाले होते. भ्रष्टाचारी आणि अनाचारी मनुष्य मंदिर बांधू शकत नाही आणि बांधले तर देव त्याच्यात वस्ती करीत नाही.

माझे मत आता दुभंगले आहे. पाण्याने भरलेला प्याला मध्यातून दोन भागांत विभागला जावा, तसे वाटते आहे. एका भागात भारत आहे; तर दुसऱ्या भागात मालदीव नावाचा देश. अर्थात पाणीच ते! डचमळते, हलते, इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे होत असते. मालदीव आणि भारत मनातल्या मनात एक दुसऱ्यात मिसळतात, हसतात, खेळतात, बोलतात. मनाच्या या अवस्थेचे नेमके वर्णन करता येत नाही. कारण ती अवस्था स्वत:लाच पूर्णपणे कळत नाही. पण एवढे कळते, की नवी दिल्लीच्या क्षितिजावर मला मालदीवचा सूर्योदय दिसतो, तर कधी कधी मालदीवच्या समुद्रात कुतुबमिनार डोकावताना दिसतो. विदेश सेवेत दर दोन-तीन वर्षांनी अशी वेळ येते जेव्हा आपण संक्रमणाच्या रेषेवर उभे असल्याचे स्पष्टपणे जाणवते. आताचे पाऊल भारतात, त्यानंतरचे पाऊल विमानात व त्यानंतरचे पुढचे पाऊल नव्या भूमीत, अशी तीन पावलात घडून येणारी पाच स्थित्यंतरं मनावर चित्रांकित आहेत. आता सहाव्या स्थित्यंतरासाठी मी पाऊल उचललेलं आहे. देशाचा प्रतिनिधी म्हणून प्रतिष्ठेच्या पदावर जात असतानासुद्धा प्राण तळमळतोच तळमळतो. माणूस म्हणून आपण किती सहज विरघळतो आणि हे विरघळणे वय वाढलं तरी थांबत नाही ही जाणीव जिवाला अधिकच कावरीबावरी करते.

साऱ्या जगाला भेडसावणारा फायनान्शियल क्रायसिस मुळात सुरू झाला तो अमेरिकेपासून, खरं तर वॉल्स स्ट्रीटवरच्या लोभी, हावरट आणि सट्टेबाजांनी लादलेल्या सबप्राइम क्रायसिसपासून. नुकत्याच संपलेल्या जी-२० परिषदेत त्याचे पडसाद उमटलेच. ओबामांनी या क्रायसिसची नैतिक जबाबदारी स्वीकारलीच, पण हा क्रायसिस एकटय़ा अमेरिकेकडून सोडवला जाईल अशा भ्रमात जगानं राहू नये, त्यासाठी सर्वाचे मिळून एकत्रित आणि एकदिशा प्रयत्न उभे करावे लागतील असा ठोस आग्रहही त्यांनी या परिषदेत मांडला, त्या निमित्ताने.. आ ताच्या आर्थिक अरिष्टाविषयीच्या जवळपास सगळ्याच चर्चामध्ये ‘सबप्राइम क्रायसिस’चाच प्रामुख्यानं उल्लेख होतो. एवढंच नव्हे तर सबप्राइम क्रायसिसमुळेच हे आर्थिक अरिष्ट ओढवलं, नाहीतर आर्थिक विकास हा असाच झपाटय़ानं होत राहिला असता, असं काही लोकं आपल्याला सांगत असतात. थोडक्यात अमेरिकेतल्या ‘वॉल्स स्ट्रीट’वरच्या काही लोकांचा हावरटपणा, सट्टेबाजी आणि लोभी वृत्ती हीच या अरिष्टाला कारणीभूत आहे. हे वाईट घटक अर्थव्यवस्थेतून जर काढून टाकता आले आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणलं तर अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालेल’, असंही आपल्याला वारंवार सांगण्यात येतं- अगदी जोसेफ स्टिगलिट्झसकट सगळ्यांकडून!