Leading International Marathi News Daily
रविवार, ५ एप्रिल २००९

शल्य राहील
दशमांत गुरू, राहू, सोमवारचं बुध राश्यांतर यातून बरीच प्रकरणं मार्गी लावता येतील. शब्दांचा प्रभाव, प्रतिष्ठेचा दबाव यांचाही त्यासाठी उपयोग करून घेता येईल. त्यात संयम मात्र आवश्यक राहील. शनी -मंगळाच्या प्रतियोगातील प्रतिसादामुळे भ्रमात राहून कृती करू नका. त्यात रवी, शुक्र व्ययस्थानी असल्याने विचारपूर्वक कृती करा. रवी, गुरू शुभयोग धर्मकार्यातून आनंद देईल.
दिनांक - ६, ७, १०, ११ शुभकाळ.
महिलांना- संयमातून आनंद मिळवता येईल.

नेत्रदीपक यश
भाग्यात गुरू, राहू, लाभात रवी, शुक्र असल्याने झटपट निर्णय घेऊन कृती सुरू ठेवली, तर शुक्रवारच्या रवी, गुरू शुभयोगाच्या आसपास नेत्रदीपक यशाने स्वत:चा ठसा उमटवता येईल. चतुर्थात शनी, दशमातील मंगळ यांच्यातील प्रतियोगाचा यात हस्तक्षेप होऊ नये यासाठी निर्णय, कृती नियमांच्या बाहेर जायला नकोत. राजकारण, कला-साहित्य खरेदी-विक्री, व्यापारी देवघेव यांचा समावेश त्यात ठेवता येईल.
दिनांक- ५, ८, ९ शुभकाळ.
महिलांना- निर्धाराने समस्यांचं निवारण करा.

बाजी मारता येईल
दशमात रवी, मीन, शुक्र सोमवारचं बुध राश्यांतर ‘थेंबे थेंबे तळे साचे’ याचा प्रत्यय या ग्रहकाळात येतो. त्यात कल्पकता परिश्रम यांचा समन्वय ठेवला, तर मोठय़ा उलाढालीतही बाजी मारून जाता येईल आणि मंगळ, शनी यांच्या प्रतियोगाचा धोकाही टाळता येईल. बौद्धिक क्षेत्रात प्रभाव वाढत राहील. बुध, नेपच्यून शुभयोगातून काही व्यवहारांना कलाटणी मिळणार आहे.
दिनांक- ६, ७, १०, ११ त्याची प्रचीती येईल.
महिलांना- विचारपूर्वक पवित्रा घ्या, यशस्वी व्हाल.

विचलित होऊ नका
भाग्यांत सूर्य, मीन, शुक्र तसेच सप्तमात गुरू, राहू आणि सोमवारचं बुध राश्यांतराने व्यवहारामध्ये वेगाने नवे बदल घडून येऊ लागतील आणि शुक्रवारच्या रवी, गुरू शुभयोगाच्या आसपास यश मिळेल. त्यातून श्रेष्ठत्व सिद्ध होऊ शकेल. रविवारपासून मंगळ, शनी प्रतियोगाचे प्रतिसाद संशय निर्माण करीत राहतील. परंतु विचलित होऊ नका. सतर्क राहून उलाढाली सुरू ठेवा. बढती-बदलीचे योग येतील. सामाजिक समस्या सुटतील. व्यापारात भरभराट व्हावी. शुभकार्ये ठरतील. वाहन जपून चालवा.
दिनांक- ५ ते ९ शुभकाळ.
महिलांना- समस्यांवर विजय मिळवाल आणि संसार, समाजकार्यात आनंद मिळवाल.

उत्साह वाटेल
रविवारच्या शनी, मंगळ प्रतियोगापासून विरोध आणि प्रश्न एकत्र समोर येऊ लागतील. षष्ठातील गुरू, राहूमुळे यात शत्रूंचा समावेश महत्त्वाचा ठरेल. सध्या तरी परीक्षण-निरीक्षणाच्या पुढे सरकू नये. सोमवारी बुधाचा प्रवेश भाग्यात होईल आणि विचारांमध्ये उत्साह प्रकटेल. त्याचा फायदा समस्यांतून बाहेर पडण्यासाठी होऊ शेकल. परंतु यश निश्चित होईपर्यंत गुप्तता, सावधानता बाळगा.
दिनांक- ६ ते १० शुभकाळ
महिलांना- अवघड जबाबदाऱ्या घेऊ नका. वाद टाळा, प्रपंचात लक्ष ठेवा.

सफलता संशयात
रविवारी शनी, मंगळ प्रतियोग होत आहे. सोमवारी बुध अष्टमात येत आहे. समस्या आणि संभ्रम यांच्या कार्यप्रांतात होत असलेला समावेश सफलता संशयात आणणारा ठरू शकेल. कन्या व्यक्तींनी प्रत्येक विभागात रागरंग पाहून कृती करावी. दुसऱ्यांवर विश्वासून अपूर्ण माहितीच्या आधाराने साहस करूच नका. पंचमातील गुरू, राहू प्रार्थना आणि प्रयत्नातून प्रतिष्ठा सांभाळणारी शक्ती देतील. वाहन जपून चालवा, मूल्यवान वस्तू सांभाळा. औषध उपचारात दुर्लक्ष नको.
दिनांक- ८ ते ११ शुभकाळ
महिलांनो- सत्यच यशासाठी उपयुक्त ठरेल.

अडचणी वाढतील
चतुर्थातल्या गुरू, राहूचे परिणाम रविवारच्या शनी-मंगळ प्रतियोगामुळे तीव्र होतील आणि तुला व्यक्तींच्या कार्यपथावरील प्रवासांत छोटय़ा-मोठय़ा अडचणी वाढू लागतील. वाद-स्पर्धा टाळा. शासकीय नियम विसरू नका. अवास्तव खर्च नको. आरोग्य उपचारांवर लक्ष ठेवा आणि व्यापार, राजकारणात झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या. सोमवारचं बुध राश्यांतर आणि बुध- मंगळाचा शुभयोग युक्ती, उत्साहातून अडचणी दूर करणारी शक्ती देतील, त्यातून इभ्रतही सांभाळाल.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभकाळ
महिलांना : प्रेमात फसू नका. लोभात अडकू नका. नियमित कार्ये सुरू ठेवा.

शांत राहा, यश मिळेल
रविवारच्या शनी मंगळ प्रतियोगाच्या कक्षेत प्रपंच ते उद्योग असा मोठा विभाग येत असल्याने शांती आणि सामोपचाराचा अधिकाधिक उपयोग करूनच ही कक्षा सांभाळावी लागणार आहे. त्यामध्ये पराक्रमी गुरू, राहूचं सहकार्य मिळेल. शुक्रवारच्या रवी-गुरू शुभयोगाच्या आसपास प्रयत्न हुशारीनं त्याचं रूपांतर व्यापार, राजकारण, कला यातील यश निश्चित करण्यासाठी होऊ शकेल. आरोग्य उपचारांवर लक्ष ठेवा. परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल. मंगलकार्य ठरावे. वाहन जपून चालवा.
दिनांक : ६ ते ९ शुभकाळ
महिलांना: शांततेने वाटचाल करा.

सामना कराल, यश मिळवाल
रविवारच्या मंगळ शनी प्रतियोगाशी अनुकूल गुरू, राहू आणि सोमवारच्या बुध राश्यांतरामुळे सामना करता येईल. त्यातून सुरू असलेल्या उपक्रमांमध्ये यश मिळवू शकाल, परंतु शब्द, कृती, निर्णय यामध्ये अतिशयोक्ती टाळा. आपत्ती प्रभाव कमी होईल. बुध-नेपच्यून शुभयोगातून अनपेक्षित व्यापारी लाभ होतील. महत्त्वाचा दस्तऐवज हाती यावा. बौद्धिक क्षेत्रात स्वत:ची वर्तुळे तयार करता येतील. लोभात अडकू नका. नियमित कार्ये सुरू ठेवा. रवी गुरू शुभयोग धार्मिक विचारांना स्थिर करतो. यात्रा संभवतात.बौद्धिक क्षेत्रात स्वत:ची वर्तुळे तयार करता येतील.
दिनांक : ६ ते १० शुभकाळ
महिलांना : यश मिळेल, संयम आवश्यक.

कार्यभाग साधता येईल
राशीस्थानी गुरू-राहू, पराक्रमी सूर्य मीन शुक्र यांना हुशारी, शिकस्तीचे प्रयत्न यांची साथ दिलीत, तर रविवारच्या मंगळ-शनी प्रतियोगांच्या अनिष्टतेवर नियंत्रण ठेवून कार्यभाग साधता येईल. त्यातून काही प्रांतांत दबदबा निर्माण करू शकाल. शुक्रवारच्या रवी-गुरू शुभयोगाच्या आसपास अनपेक्षित नव्या संधीतून व्यापार, राजकारण, शिक्षण, कलाप्रांत यात आकर्षक कलाटणी देता येईल. प्रापंचिक समस्या सुटतील. नवे परिचय काही प्रकरणी उपयुक्त ठरतील. प्रयत्न केलात तरच यश मिळेल. परंतु यश निश्चित होईपर्यंत गुप्तता, सावधानता बाळगा.
दिनांक : ८ ते ११ शुभकाळ
महिलांना : संसारात प्रसन्न राहाल. सांस्कृतिक क्षेत्रात चमकाल.

शोधकार्यातून आनंद
व्ययस्थानी गुरू, राहू रविवारी मंगळ-शनी प्रतियोग होत आहे. सध्या तरी ‘अशुभस्य कालहरणम्’ हाच मंत्र नियमित उपक्रमांच्या संरक्षणासाठी उपयुक्त ठरेल. त्यात मीन शुक्र सोमवारचं बुध राश्यांतर अनुकूल सूर्य यांचा उपयोग होईल आणि शनिवारच्या चंद्र शनी नवपंचम योगापर्यंत प्रतिष्ठा सांभाळीत संपर्क, चर्चा, देवघेव, बैठकी, लिखाण वगैरे सुरू ठेवता यईल. तरीही वाहनांचा वेग, मूल्यवान वस्तू, प्रकृतीच्या तक्रारी या संबंधात दुर्लक्ष नको. बौद्धिक क्षेत्रात स्वत:ची वर्तुळे तयार करता येतील. बुध नेपच्यून शुभयोग शोधकार्यात आनंद देतो.
दिनांक : ६, ७, १०, ११ शुभकाळ
महिलांना : साहस नको, वाद टाळा, सत्य यशासाठी उपयुक्त ठरेल.

प्रभाव वाढेल
राशीस्थानी सूर्य, मीन, शुक्र, लाभात गुरू, राहू सोमवारचं बुध राश्यांतर यांच्या बैठकीतून राशीकुंडली मजबूत झालेली असल्याने मंगळ- शनी प्रतियोगाचे आघात पचवून महत्त्वाच्या क्षेत्रांत प्रभाव निर्माण करू शकाल. शुक्रवारच्या रवी-गुरू शुभयोगाच्या आसपास त्याचा प्रकर्षांने प्रत्यय येईल. धंद्यात सुधारणा होईल. सत्तेत सहभागी होता येईल,प्रापंचिक समस्या सुटतील. नवे परिचय काही प्रकरणात उपयुक्त ठरतील. प्रवास होतील. शिक्षणात यश मिळवाल. व्ययस्थानी मंगळ असेपर्यंत पाहुणे पिच्छा सोडणार नाहीत आणि खर्च कमी होणं अवघड आहे.परमेश्वरी चिंतनातून आनंद मिळेल.
दिनांक : ५ ते ९ शुभकाळ
महिलांना : अपेक्षित यशासाठी हुशारीने मार्ग शोधावे लागतील.