Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

दुहेरी लढतीची परंपरा कायम
वर्धा

प्रशांत देशमुख

वर्धा लोकसभा मतदारसंघातील दुहेरी लढतीची परंपरा यावेळीही कायम असून विद्यमान खासदार भाजपचे सुरेश वाघमारे व काँग्रेसचे दत्ता मेघे यांच्यातच सामना रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत मतदारांनी प्रत्येक वेळी नवा चेहरा ‘कामाला’ लावल्याचा इतिहास आहे. त्याची याहीवेळी पुनरावृत्ती होणार काय? वाघमारे व मेघे दुसऱ्यांदा परस्पर विरोधात लढत देत आहे आणि दोघेही तिसऱ्यांदा वर्धेतून उभे आहेत. नागपूर, रामटेक, वर्धेतून खासदार होण्याचा विक्रम असणाऱ्या मेघेंना ‘राष्ट्रवादी’ची घडय़ाळ बांधून लढताना वर्धेकरांनी पराभव दाखविला होता. आज मेघे ‘पंजा’वर मते मागत आहेत.

जातीय समीकरणे प्रबळ ठरणार
अमरावती

मोहन अटाळकर

अमरावती लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत असून पहिल्यांदाच राखीव झालेल्या या मतदारसंघात दलितेतर मतांच्या ध्रुवीकरणावरच विजयाचे गणित अवलंबून राहील. प्रचारादरम्यान ‘स्थानिक-परका’ असा वाद पेटवण्यात आल्याने शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई व बसपचे गंगाधर गाडे या प्रमुख उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.

परप्रांतीयांच्या लोंढय़ांना रोखण्याची मनसेच्या जाहीरनाम्यात मागणी
संदीप आचार्य, मुंबई, ५ एप्रिल
रेल्वेसह राज्यातील सर्व केंद्रीय सेवाकार्यालयांमध्ये ८० टक्के मराठी उमेदवारांची भरती
मुंबईतून केंद्राला मिळणाऱ्या महसुलात राज्याला ५० टक्के वाटा
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीच्या राज्यातील जागांमध्ये केंद्राचा ५० टक्के कोटा रद्द करणे
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नागरी पुनर्निमाण योजनेची व्याप्ती वाढविणे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून केंद्र शासनाला तब्बल ६८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र त्यातून महाराष्ट्राला योग्य वाटा मिळत नसून हा वाटा मिळण्याबरोबरच मुंबईसह राज्यात दररोज येणारे परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी कायदा करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जाहिरनाम्यात घेण्यात येणार असल्याचे विश्वसनीयरीत्या समजते. पुढील आठवडय़ात राज ठाकरे हे मनसेचा जाहिरनामा प्रसिद्ध करणार आहेत.

आठवणीतल्या लढती..
..मगरूर बादशाही रह जाएँ हाथ मलते!

एखाद्या नेत्याच्या किंवा राजकीय पक्षाच्या प्रमाणाबाहेर आत्मविश्वासाला सामान्य जनता त्या नेत्याचा, त्या पक्षाचा मगरूरपणा समजते. त्यामुळेच तर दुसऱ्या लोकसभेत महाराष्ट्रात सांगली मतदारसंघात अतक्र्य घडले. आधी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९५७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सांगलीत काँग्रेसला पराभवाची कडू गोळी गिळावी लागेल, असे कोणालाही वाटले नव्हते. अनपेक्षित निकालामुळेच ही निवडणूक सर्वाच्या चांगलीच लक्षात राहिली आहे.

सपाच्या घसरणीत बसप, भाजपला संधी
सुनील चावके

मुस्लिमांबद्दल भडक विधाने करून वरुण गांधींनी स्वतला रासुकाच्या सापळ्यात अडकवून घेऊन उग्र हिंदूत्वाचा मुद्दा प्रचारात आणण्यापूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशातील हिंदू-मुस्लीम संघर्ष लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने शिगेला पोहोचला आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी, योगी आदित्यनाथ, महावीर प्रसाद, मोहन सिंग या दिग्गजांचे भवितव्य या संघर्षांतच निश्चित होणार आहे.

प्रादेशिक पक्षही मोठय़ा ताकदीने पुढे आले- पवार
सांगली/ शिराळा, ५ एप्रिल / प्रतिनिधी

दगडफेक करून अथवा वाहनांच्या काचा फोडून प्रश्न सुटत नाहीत. देश चालवायचा असेल, तर सर्व जाती-धर्माच्या जनतेला एकत्र घेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी लागेल. त्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या गुजरातपेक्षा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात महाराष्ट्रीयन जनतेला प्रिय आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी रविवारी केली.

मनोहर जोशी यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा
मुंबई, ५ एप्रिल/प्रतिनिधी
शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा राज्यभराचा झंझावाती निवडणूक दौरा मंगळवार, ७ एप्रिलपासून सुरू होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जाहीर सभा होणार आहेत. ७ एप्रिल रोजी सकाळी मनोहर जोशी हे विदर्भाच्या दौऱ्यावर निघणार आहेत. अमरावतीस सायंकाळी ६ वाजता चांदूर बाजार येथे जाहीर सभा, रात्री ८.३० वाजता बडनेरा येथे जाहीर सभा होईल. बुधवार, ८ एप्रिल रोजी कारंजा येथे एका जाहीर सभेत मार्गदर्शन करून मनोहर जोशी हे नागपूर मुक्कामी रवाना होणार आहेत.

काश्मीरमधील निवडणूक उधळण्यासाठी ४०० दहशतवादी घुसण्याच्या तयारीत
नवी दिल्ली, ५ एप्रिल/ पीटीआय
लोकसभा निवडणुका उधळून लावण्यासाठी ४०० प्रशिक्षित दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या असतानाच सरकारने तेथील सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिले आहेत.

वाढत्या उन्हाचा प्रचाराला फटका
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी
लोकसभा निवडणूक आता केवळ दहा दिवसांवर आली असल्याने राजकीय वातावरण तापलेले आहे. मात्र, वाढत्या उष्म्यामुळे प्रचारसभा, मिरवणुकींना मतदारांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने विविध राजकीय पक्षांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.यावेळी ऐन उन्हाळ्यात निवडणुका आल्या आहेत. या उन्हाळ्याची झलक फेब्रुवारीत मिळाली आणि मार्चमध्येच पाऱ्याने विक्रमी वेग घेतला. सकाळपासूच कडक उन्हाचे चटके बसू लागतात.

माफी मागितली तरच भाजपला मदत! आगरी सेनेचा निर्णय
ठाणे, ५ एप्रिल/प्रतिनिधी
आगरी सेनाप्रमुख राजाराम साळवी यांनी केलेल्या भाजप उद्धारानंतर युतीत शिवसेनेची अडचण झाली असतानाच आज आगरी सेनेने भाजपवर आणखी एक वार केला. सेनाप्रमुखांच्या अवमानाबद्दल जोवर भाजप जाहीर माफी मागत नाही, तोपर्यंत त्यांना निवडणुकीत मदत करणार नाही, उलट त्यांना धडा शिकविण्याचा निर्णय आज झालेल्या मेळाव्यात घेण्यात आला. त्यामुळे आता युतीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

कुणी देवाचिये द्वारी, कुणी मतदारांच्या दारी!
संजय बापट, ठाणे, ५ एप्रिल

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यामुळे ठाणे-मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करण्याबरोबरच प्रचाराच्या तोफा खऱ्या अर्थाने धडाडू लागतील. मात्र प्रचाराला रंग भरण्यापूर्वी कार्यकर्त्यांना ताजेतवाणे करण्यासाठी काही राजकीय पक्षांनी देवदर्शन सहलींचे आयोजन केले आहे, तर काही पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांना शहर सोडून जाण्यास मज्जाव केला आहे, तर फ्रेश झालेले कार्यकर्ते प्रचाराचे रान उठविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

सोयीनुसार बोलणाऱ्या पवारांना पराभूत करा - मुंडे
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
सकाळी डॉ. मनमोहनसिंग यांना पंतप्रधान म्हणून पाठिंबा देणारे, दुपारी स्वत:चेच नाव पंतप्रधानपदासाठी घोषित करणारे आणि सायंकाळी तिसऱ्या आघाडीशी चर्चा करणारे शरद पवार हे सोयीनुसार बोलत असल्याने त्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करा, असे आवाहन भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातील कोंढा-कोसरा येथे झालेल्या जाहीर सभेत मुंडे यांनी पवारांवर तोफ डागली.

काँग्रेस-भाजपने एकत्रित निवडणूक लढवावी
भोजपुरी अभिनेत्याची सूचना
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी विविध राजकीय पक्ष चित्रपट अभिनेते, खेळाडू यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात गुंग असतानाच भोजपुरी अभिनेता सुदीप पांडे यांनी केलेल्या अजब सूचनेमुळे कोणताही पक्ष त्यांना प्रचारासाठी पाचारण करण्याची शक्यता मावळली आहे.

सोनिया गांधी शुक्रवारी राज्यात
मुंबई, ५ एप्रिल / प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या १० एप्रिल रोजी महाराष्ट्रात एका दिवसाच्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर येणार असून विदर्भातील चार मतदारसंघात त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ आणि रामटेक या लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्या येणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रसचे सरचिटणीस संजय दत्त यांनी दिली.