Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

नागपूर व रामटेक मतदारसंघाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण

 

शिबीर वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजिक करण्यात आले होते.
या प्रशिक्षण शिबिरामध्ये अधिकाऱ्यांनी आदर्श निवडणूक पद्धती राबवावी यासाठी ई.व्ही.एम. मशीनचे (व्होटींग मशीन) प्रात्यक्षिक प्रशिक्षण, स्लायडिंग शो व शंका समाधान आदी बाबींचा या प्रशिक्षण शिबिरामध्ये समावेश होता.
१० ते १२ एप्रिल या कालावधित मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठी निवडणूक क्षेत्रीय अधिकारी प्रशिक्षण देणार असल्याचे ९-रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. तसेच दहा ते पंधरा मतदान केंद्रे (पोलिंग बुथ) हे क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या अधिकारामध्ये समाविष्ट राहणार असल्याचेही ते म्हणाले.
मतदान प्रक्रियेमध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून मतदार प्रभावित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केंद्रीय निरीक्षक अश्विनीकुमार रॉय यांनी केले. तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. यावेळी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर मतदान केंद्राध्यक्षांसाठी निर्देश पुस्तिकेचे वितरणही करण्यात आले.
प्रशिक्षण वर्गाचे संचालन सावनेरचे तहसीलदार संतोषकुमार देशमुख यांनी केले. या प्रशिक्षण शिबिरासाठी निवडणूक निर्णय अधिकारी धीरजकुमार, केंद्रीय निवडणूक निरीक्षक अश्विनीकुमार रॉय, साहू, १२-विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मोठय़ा संख्येने क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.