Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष ढोके यांची हकालपट्टी
नरेंद्र डोंगरे यांची नियुक्ती
नागपूर, ५ एप्रिल/प्रतिनिधी

रामटेक लोकसभा मतदारसंघातून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष गोपीचंद ढोके यांनी काँग्रेसचे उमेदवार मुकुल वासनिक

 

यांना पािठबा जाहीर केला होता.
ढोके यांच्या पक्षविरोधी कारवाईमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली, तर त्यांच्या जागेवर नरेंद्र डोंगरे यांची नियुक्ती करण्यात आली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोपीचंद ढोके यांनी पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याने त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी बडतर्फ करण्यात आले आहे. यापूर्वीही पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ढोके यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी नरेंद्र डोंगरे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली असल्याचे पक्षाचे उपाध्यक्ष थॉमस कांबळे यांनी कळविले आहे. रिपब्लिकन आणि ओबीसी बहुजन मतांचे विभाजन होऊ नये आणि रिपब्लिकन चळवळीच्या यशाचा मार्ग प्रशस्त व्हावा आणि सर्व शक्तीनिशी रिपब्लिकन उमेदवार अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या विजयी व्हाव्यात, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले. अ‍ॅड. कुंभारे यांच्या समर्थनार्थ आपण उमेदवारी मागे घेतली असल्याचे कवाडे यांनी यावेळी सांगितले.