Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

शाकाहाराचा संदेश देत निघाली स्कूटर मिरवणूक
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

श्री जैन सेवा मंडळातर्फे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर महावीर यांच्या २६०८ व्या जयंतीनिमित्त रविवारी इतवारीतील शहीद चौक येथून शाकाहाराचा संदेश देणारी स्कूटर मिरवणूक काढण्यात

 

आली.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश लांबट यांनी हिरवी झेंडी दाखवून मिरवणुकीला रवाना केले. याप्रसंगी श्री जैन सेवा मंडळाचे अध्यक्ष सुमत लल्ला, मंत्री रोहित शाह, संयोजक सुरेश डायमंड, नगरसेविका गीता छाडी, शिखरचंद मोदी, अभयकुमार पनवेलकर, निर्मल छाजेड प्रामुख्याने उपस्थित होते. शहीद चौकातून निघालेली शाकाहार संदेश स्कूटर मिरवणूक शहरातील विविध मार्गाने जाऊन जैन मंदिरात दर्शन घेऊन मेयो रुग्णालयाजवळील भगवान उद्यानात पोहचली.
तुलसीनगर जैन समाज, जैन मंदिर, सूर्यनगर, संभवनाथ महिला मंडळ, कांतीलाल भागवतकर, नादगा जैन समाज, सुमतीनाथ जैन मंदिर, लक्ष्मीनगर जैन मंदिर, सोना सन्स या संस्थेतर्फे मार्गात शरबत, थंड पाणी, नाश्ता, कोल्ड्रींगची व्यवस्था करण्यात आली होती. मेयो रुग्णालयाजवळील भगवान महावीर उद्यानमध्ये समाजसेवक नरेश जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
याप्रसंगी मेयोचे अधीष्ठाता डॉ. आनंद डोंगरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए.बी. दासरवर, छाया निमसरकार प्रामुख्याने उपस्थित होते.
आई त्रिशलेच्या वेशभूषेत छाया जैन, झांशीच्या राणीच्या वेशभूषेत अंकिता संजय बेलसरे स्कूटर मिरवणुकीत सहभागी झाले होते. गाडी सजावटीचा प्रथम पुरस्कार वृषभ काटोलकर, द्वितीय पुरस्कार रोहित शाह यांनी पटकावला. मिरवणुकीच्या समारोपानंतर विजयी स्पर्धकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या मिरवणुकीत कमलाकांत गोंदवाले, रमेश मोदी, किशोर बेलसरे, दीपक जव्हेरी, सतीश पेंढारी, रवींद्र आग्रेकर, संजय टक्कामोरे, ललित जैन, शरद मचाले, सुरेश आग्रेकर, प्रदीप तुपकर, जेठमल डागा, ज्ञानचंद बरया, घनश्याम मेहता, अशोक जीवंधर जैन, आलोक गहाणकारी, प्रसन्ना नांदगावकर आदी सहभागी झाले होते.