Leading International Marathi News Daily
सोमवार , ६ एप्रिल २००९
(सविस्तर वृत्त)

विविध कलमांद्वारे ४१ आरोपींवर कारवाई
नागपूर, ५ एप्रिल / प्रतिनिधी

लोकसभा निवडणूक तसेच सणांदरम्यान शांतता राहावी यासाठी गुन्हेगारांची शहर पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. विविध कलमांद्वारे एकूण ४१ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

 

याशिवाय मुंबई जुगार कायद्यान्वये ६ तर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये १७ अशा एकूण २३ आरोपींना अटक करून त्यांच्याजवळून एकूण १ लाख ४२ हजार ६८८रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला़ शहरात नाकाबंदी दरम्यान ४१७ वाहनांची तपासणी करून ९ वाहन चालकांना चालान करण्यात आले. लकडगंज पोलीस ठाण्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या गरुड पथकाने मारवाडी चौकात आरोपी मयुर रामचंद्र नेरीकर (रा़ नवीन सुभेदार ले-आऊट) याला अटक केली. शर्टात मागे मानेपासून कमरेपर्यन्त खोचलेली एक तलवार त्याच्याजवळून जप्त करण्यात आली.
काल शनिवारी रेल्वे स्थानकासमोर दुपारी जुगार खेळणाऱ्या माधव गजानन बकरे (रा़ शांतीनगर), मोहम्मद शमीम मोहम्मद हनीफ (रा़ मोमीनपुरा), सोनू श्रीराम मालवी (रा़ कुंदनलाल गुप्तानगर) व मोहम्मद अहमद हबीब अहमद (रा़ टिमकी) या आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पत्ते व रोख दोन हजार रुपये जप्त करण्यात आले. िहगणा औद्योगिक वसाहतीमधील ट्रॅक्टर कंपनी चौकात केशव तेजबलीसिंग ठाकूर (रा़ राजीव गांधी नगर) याला पकडून १८० मिलीच्या ४८ बाटल्या (कि ंमत १ हजार रुपये) जप्त करण्यात आल्या.
लोखंडी पूल ते झाशी राणी चौक या परिसरात देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या पाच महिलांना सामाजिक सुरक्षा पथकाच्या पथकाने दुपारी पकडले. हे पथक या परिसरात गस्त घालत असताना आरोपी महिला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातवारे व अश्लील इशारे करीत असल्याचे पथकाला दिसल़े