Leading International Marathi News Daily

सोमवार , ६ एप्रिल २००९

राज्य

तब्बल दीड वर्षांने झाली मायलेकींची भेट!
ठाणे, ५ एप्रिल / प्रतिनिधी
रेल्वेतून पडल्याने दीड वर्षांपासून कोमात गेलेली एक महिला..तिच्या घरच्यांना याचा पत्ता नसल्याने ती कुठेतरी हरवली किंवा मेली असे समजून कुटुंबीयदेखील विसरलेले..दीड वर्षांनंतर कोमात गेलेली महिला शुध्दीवर येते..सुदैवाने तिची स्मृती गेलेली नसते, त्या महिलेची मुलगी तिला भेटते आणि दीड वर्षांनी मायलेकींची गळाभेट झाली. हे दृश्य एखाद्या हिंदी चित्रपटातील नाही, तर ही सत्य घटना घडली आहे, मुरबाडच्या यशवंतीच्या बाबतीत. मुरबाड येथे राहणारी यशवंती पडवळ (४५) हिला चार मुली व एक मुलगा आहे. नऊ वर्षांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले.

उन्हाळी विशेष गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये कोकणला ठेंगा!
अभिमन्यू लोंढे, सावंतवाडी, ५ एप्रिल

कोकण रेल्वे मार्गावरून २२० उन्हाळी विशेष गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये कोकणला ठेंगा दाखविण्यात आल्याचे बोलले जात आहे. कोकण रेल्वे सुरू होऊन दशकभराहून अधिक काळ लोटला तरीही महाराष्ट्राच्या शेवटच्या सावंतवाडी रोड स्थानकापर्यंत एकही प्रवासी गाडी सोडण्यात आली नाही. टर्मिनन्सची मागणी धुडकावण्यात येऊनही कोकणी लोकांचा स्वाभिमान थंडावला आहे.

निवडणूक खर्चापेक्षा हिशेबाचीच उमेदवारांना धास्ती
नागपूर, ५ एप्रिल/ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने ठरवून दिलेली खर्चाची मर्यादा अतिशय कमी असल्याने आणि प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी पटीने अधिक खर्च होत असल्याने त्याचा हिेशेब आयोगाकडे सादर करताना उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

काँग्रेस-शिवसेना युतीचा
बंदोबस्त निवडणुकीनंतर - राणे

चिपळूण, ५ एप्रिल/वार्ताहर गेले काही दिवस चर्चेत असणाऱ्या येथील नगर परिषदेमधील काँग्रेस-शिवसेना युतीचा लोकसभा निवडणुकीनंतर बंदोबस्त करणार असल्याचे स्पष्टीकरण उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज केले.

शरद पवार यांची आज कर्जतमध्ये जाहीर सभा
कर्जत, ५ एप्रिल/वार्ताहर

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आझमभाई पानसरे यांच्या प्रचारासाठी कर्जत- दहिवली येथील मार्केट यार्ड येथे सोमवारी (६ एप्रिल) सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेस शरद पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आझमभाई पानसरे, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जे. टी. पाटील, माजी आमदार सुरेश लाड, वसंतराव भोईर, अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या राज्यस्तरीय सल्लागार समितीचे सदस्य पुंडलिक पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.